‘फिल्म मेकिंग’ कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 00:59 IST2016-05-12T00:15:26+5:302016-05-12T00:59:18+5:30
औरंगाबाद : शहरात १६ ते २२ मे दरम्यान ‘फिल्म मेकिंग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘फिल्म मेकिंग’ कार्यशाळा
औरंगाबाद : एमजीएम कॉलेज आॅफ जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन, हरेर प्रोडक्शन, परब क्रिएशन आणि लोकमत युवा नेक्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात १६ ते २२ मे दरम्यान ‘फिल्म मेकिंग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात प्रथमच फिल्म मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यातून चित्रपट निर्मितीची कला अवगत करून घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.
गेल्या काही वर्षांत जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आहे. शिवाय अनेकांकडे कॅमेरा हमखास असतो. त्यामुळे समारंभ असो की, अन्य क्षण छंद म्हणून त्याचे कलात्मक पद्धतीने चित्रीकरण करण्यावर भर दिला जातो; परंतु हा छंद जोपासताना तो करिअरमध्ये रूपांतरित क रता येतो आणि जीवनात यशस्वी भरारी घेता येते. याच दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एमजीएम कॉलेज जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन येथे होणाऱ्या या सातदिवसीय कार्यशाळेत अभिनेत्री भार्गवी चिरमुले, लेखक आणि दिग्दर्शक अरविंद जगताप, गायक आणि संगीत दिग्दर्शक प्रा. राजेश सरकटे, प्रा. डॉ. रवींद्र बनसोड, गायक नितीन सरकटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिवाय फिल्म मेकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण देणार आहेत. या कार्यशाळेचे मीडिया पार्टनर रेडिओ मिर्ची आहेत. अधिक माहितीसाठी ८२३७११६५७२, ८२३७७७९९३३, ८९८३२१४६५० व ९८५००९९८१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
यावर होणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कार्यशाळेत डायरेक्शन, सिनेमाटोग्राफी, म्युझिक कंम्पोझिशन, एडिटिंग, स्क्रीप्ट रायटिंग, शॉर्ट फिल्म मेकिंग, मोबाईल फिल्म शूटिंग यांसह विविध बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. शिवाय स्टुडिओला भेट देण्याची संधी मिळणार आहे.