ग्रामसेवकांच्या संपाने कामे खोळंबली
By Admin | Updated: July 14, 2014 01:01 IST2014-07-13T23:23:50+5:302014-07-14T01:01:45+5:30
वरूड बु.: ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले.

ग्रामसेवकांच्या संपाने कामे खोळंबली
वरूड बु.: ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले. त्यामुळे गग्रामसेवक गावात फिरकत नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी लागणारे विविध कागदपत्रांअभावी ताटकळत बसावे लागत आहे. ग्रामस्थांचीही कामे खोळबंली आहे.
ग्रामसेवक संघटनेने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वतंत्र योजना करावी, २० ग्रामपंचायतीसाठी पर्यवेक्षीय एक विस्तार अधिकारी नेमणूक करावा, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यातील वेतन त्रटी दूर करावी, ग्रामसेवकांना प्रवास भत्ता तीन हजार रूपये प्रतिमाह देण्यात यावा या व अन्य मागण्या करिता आंदोलन सुरू केलेले आहे.
ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामस्थांचीही कामे खोळंबली आहेत. ग्रामपंचायत कडून नमुना न. ८ मिळणे, रहिवासी प्रमाणप्रत्र, जन्म मृत्यू चा दाखला, विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे ,घ्यावे लागतात. मागील आठ ते दहा दिवसांपासून ग्रामसेवकांचा बेमुदत संप सुरूच असल्याने गावात ग्रामसेवकांकडे असलेली सर्व कागदपत्रे कपाटात बंद आहेत. त्यामुळे सरपंच व कर्मचाऱ्यांनाही त्याचा त्रास होत आहे.
सर्वत्र अशीच परिस्थिती
वरूड बु. सह तालुक्यात सर्वत्र ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा ग्रामस्थांना फटका असला आहे. ग्रामस्थांची अनेक कामे खोळंबली आहेत.
त्यामुळे प्रशासनाने ग्रामसेवकांच्या संपावर तोडगा काढून ग्रामसेवकांना गावात हजर राहण्याचे सक्त आदेश देऊन खोळंबलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. (वार्ताहर)$$्रिग्रामीण भागात कामे ठप्प
जालना जिल्ह्यातील बहुतांशी गावातील ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील यंत्रणा पार कोलमडून गेली आहेत. विद्यार्थी, शेतकरी तसेच सामान्य ग्रामस्थांची कामे दहा दिवसांपासून ठप्प झाली आहेत. प्रशासनाने यावर तोडगा काढवा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
ग्रामसेवक संघटनेने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वतंत्र योजना करावी,ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यातील वेतन त्रटी दूर करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे.