कार्यकर्त्यांपासून ग्रामस्थ झाले दूर
By Admin | Updated: October 12, 2014 12:11 IST2014-10-12T12:11:22+5:302014-10-12T12:11:22+5:30
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील त्यात्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्ते व नेते यांच्याकडे ग्रामस्थ पाठ फिरवून दूर जात आहेत.

कार्यकर्त्यांपासून ग्रामस्थ झाले दूर
परभणी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील त्यात्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्ते व नेते यांच्याकडे ग्रामस्थ पाठ फिरवून दूर जात आहेत. त्यामुळे या पुढार्यांची चांगलीच पंचाईत होऊ लागली आहे.
ग्रामीण भागातील नेते अथवा पुढारीपण करणार्यांकडे ग्रामस्थ आपल्या अडीअडचणी किंवा शासकीय कामे करून घेण्यासाठी धावाधाव करतात. परंतु, हे पुढारी त्या वेळी भाव खाऊन जातात. हा आपला, तो त्याचा असे म्हणून ग्रामस्थांची कामे खोळंबून ठेवतात. त्यामुळे अनेक गावातील पुढार्यांना चांगले दिवस आले होते. परंतु, ग्रामस्थ ही दर पाच वर्षानंतर होणार्या निवडणुकीची वाट पाहून असतात. निवडणुका लागल्या गाव पुढार्यांना ग्रामस्थ व सोयर्या-धायर्यांची गरज भासू लागते. अशा वेळी मात्र हे सगेसोयरे व ग्रामस्थ गाव पुढार्याला व कार्यकर्त्यांना अद्दल घडविण्यासाठी विविध युक्त्या लढवित असतात.
सध्या विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशावेळी या गावपुढार्यांना मतदारांची (ग्रामस्थांची) गरज भासू लागली आहे. हे ग्रामस्थ या गाव पुढार्यांना पाहून तोंड वळवित दुसर्या दिशेने जात आहेत. त्यामुळे या गावपुढार्यांची चांगलीच गोची होत आहे. (प्रतिनिधी)
आता मतदार खाऊ लागले भाव
■ जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक बहुरंगी होत आहे. सध्या उमेदवारांना एक-एक मतांचे पडले आहे. त्यासाठी उमेदवार वत्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून मतदारांना भेटण्यासाठी वाट्टेल ते करीत आहेत. आमच्याच पक्षाला व नेत्याला मतदान करा, असे सांगत आहेत. उमेदवार गावात तर शेतकरी (मतदार) शेतात अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसून येत आहे.
■ गावातील मतदार एवढे आमच्या जवळचे आहेत, असे गावपुढारी उमेदवारांना पटवून देत आहेत आणि निवडून आल्यानंतर हे गावपुढारी (नेत्यांकडून) उमेदवारांकडून आपले फायदे करून घेतात आणि ग्रामस्थांना वार्यावर सोडून देतात. त्यामुळे आता मतदारही भाव खाताना दिसत आहेत.