कामगार कल्याण मंडळातर्फे महिलांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:28 IST2019-03-11T23:28:13+5:302019-03-11T23:28:26+5:30

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कामगार कल्याण मंडळाच्या बजाजनगर केंद्रातर्फे रविवारी परिसरातील कर्तबगार कामगार महिलांचा गौरव करण्यात आला.

 Workers' Welfare Board honors women | कामगार कल्याण मंडळातर्फे महिलांचा गौरव

कामगार कल्याण मंडळातर्फे महिलांचा गौरव

वाळूज महानगर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कामगार कल्याण मंडळाच्या बजाजनगर केंद्रातर्फे रविवारी परिसरातील कर्तबगार कामगार महिलांचा गौरव करण्यात आला.


कामगार कल्याण भवन केंद्रात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. पद्माकर तांदुळजे तर प्रमुख पाहुणे म्हणून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जयश्री म्हस्के, अनिता त्रिभुवन या होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजया गायकवाड, वैशाली सरोदे, पुजा पाटील, सुनंदा कुलकर्णी,वंदना कानडे, लता बन, वैशाली गुरव, वैशाली अवघडे यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरव केला. कार्यक्रमाला जयश्री पाटील, सुनंदा जाधव, नूतन आडसेर, सुनिता तांदुळजे, गुणवंत कामगार पी.एस. गुजर, सतिश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्रसंचालन केंद्राचे निरीक्षक दिनकर पाटील यांनी केले. जी.एन जाधव यांनी आभार मानले.

Web Title:  Workers' Welfare Board honors women

टॅग्स :Walujवाळूज