कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही - रावसाहेब दानवे
By Admin | Updated: August 9, 2015 00:26 IST2015-08-09T00:10:58+5:302015-08-09T00:26:59+5:30
राजूर : अधिकाऱ्यांनी राजूरच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या कामाला गती देवून प्रत्यक्षात कामाला सुरूवात करावी, कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही,

कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही - रावसाहेब दानवे
राजूर : अधिकाऱ्यांनी राजूरच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या कामाला गती देवून प्रत्यक्षात कामाला सुरूवात करावी, कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी सक्त ताकीद भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा खा.रावसाहेब दानवे यांनी शनिवारी दिली.
राजूर येथे आदर्श सांसद ग्राम योजनेच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी खा.दानवे यांनी जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होेते. व्यासपीठावर आ.संतोष दानवे, जिल्हाधिकारी ए. एस. रंगानायक, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव, सीईओ दीपक चौधरी, उपमुख्यकार्यकारी पद्माकर केंद्रे, सांसद ग्रामचे समन्वयक सूर्यकांत ताठे यांची उपस्थिती होती.
आदर्श सांसद ग्राम योजने अंतर्गत राजूरच्या विकासासाठी २१ कोटी ९३ लाख रूपये खर्चाचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आढावा बैठकीत अनेकांनी मागचाच पाढा वाचून दाखविला. अधिकाऱ्यांनी आराखडा तयार केला मात्र त्यानंतर काही खात्यांनी कामाचे अंदाजपत्रक तयार केलेले नाहीत. तर काहींनी आराखड्यानंतर काहीच हालचाली केलेल्या दिसून आल्या नाहीत. अधिकाऱ्यांच्या या उदासीनतेवर खा.दानवे यांनी नाराजी व्यक्त केली. सहा महिने उलटले तरी प्रत्यक्षात कोणत्याच कामाला सुरूवात नाही, मग प्रत्यक्षात राजूर मॉडेल बनणार केव्हा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शास्त्रशुध्द पध्दतीने कामाचे नियोजन करून नजरेत भरेल असे काम करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. अधिकारी कागदी घोडे नाचवत असून, प्रत्यक्ष काम कधी करणार, आता प्रत्यक्ष कामाच्या दिशेने सुरूवात करा, नसता कुणाचीही गय करणार नाही, असा इशारा खा.दानवे यांनी दिला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकारी, कर्मचाऱ्यावर वचक नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आठ दिवसांत कामात प्रगती दाखवून १६ आॅगस्ट रोजी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करण्याची मुदत खा.दानवे यांनी अधिकाऱ्यानां दिली. यावेळी किशोर अग्रवाल, गामविकास अधिकारी एस.बी.शिंदे, गणेश साबळे, श्रीरामभाऊ पुंगळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पुंगळे, प्रशांत दानवे, उपसरपंच मुसा सौदागर आदी उपस्थित होते.
आदर्श सांसद ग्राम योजने अंतर्गत राजूरच्या विकासासाठी २१ कोटी ९३ लाख रूपये खर्चाचा कृती आराखडा तयार केलेला आहे. अधिकाऱ्यांनी आराखडा तयार केला मात्र त्यानंतर काही खात्यांनी कामाचे अंदाजपत्रक तयार केलेले नाहीत. तर काहींनी आराखड्यानंतर काहीच हालचाली केलेल्या दिसून आल्या नाहीत. अशा प्रकारांमुळे प्रत्यक्षात राजूर मॉडेल बनणार केव्हा? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.