दोन महिलांसह कार्यकर्त्यांचे मुंडण
By Admin | Updated: December 4, 2014 00:54 IST2014-12-04T00:39:06+5:302014-12-04T00:54:02+5:30
लातूर : जवखेडा खून प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून जाधव कुटुंबियावर होत असलेला अन्याय थांबविण्यात यावा, या मागणीसह लातुरात दलित कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्या

दोन महिलांसह कार्यकर्त्यांचे मुंडण
लातूर : जवखेडा खून प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून जाधव कुटुंबियावर होत असलेला अन्याय थांबविण्यात यावा, या मागणीसह लातुरात दलित कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दोन महिला व दीडशे कार्यकर्त्यांनी बुधवारी धरणे आंदोलनात मुंडण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनात शांताबाई धावारे, लक्ष्मी काकणे यांनी मुंडण केले. रिपाइंचे राज्य सरचिटणीस चंद्रकांत चिकटे, प्रा. अनंत लांडगे, जी.ए. गायकवाड, विनोद खटके, रुपेश गायकवाड, पप्पू कांबळे, जितेंद्र बनसोडे, महादू गायकवाड, रणधीर सुरवसे, दत्ता कांबळे, अॅड.डी.एम. गायकवाड, गौतम कांबळे, विशाल भोसले, धम्मपाल इंगळे, नितीन मोरे, नितीन कदम, सिद्धार्थ सूर्यवंशी, शक्ती मोरे, दिलीप सातपुते यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मुंडण करून जवखेडा खून प्रकरणाचा निषेध केला. शिवाय, लातुरात निघालेल्या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच तीन पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली.
आंदोलनात साधू गायकवाड, अमोल कारंजे, विजय बनसोडे, राम कोरडे, राहुल लातूरकर, एस.टी. चांदेगावकर, अनिल शिंदे, अॅड. अतिश चिकटे, बबिता गायकवाड, सखुबाई लातूरकर, शिलाबाई सिरसाट, शोभा सोनकांबळे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)
धरणे आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जवखेडा येथील जाधव कुटुंबियावर होत असलेला पोलिस अत्याचार थांबविण्यात यावा, राज्यातील दलित बौद्ध समाजाला संरक्षण देण्यात यावे, महाराष्ट्रातील तंटामुक्त समित्या रद्द करण्यात याव्यात, या मागण्या केल्या. जवखेडा प्रकरणी लातुरात काढण्यात आलेल्या मोर्चातील कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे लादून पोलिस प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली. त्याबद्दल पोलिस अधीक्षकांसह गांधी चौक, शिवाजी चौक आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिवाय, मोर्चामुळे झालेल्या नुकसानीला मोर्चाला जबाबदार न धरता प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावे आणि त्याची वसुलीही जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडून करावी, अशी मागणीही आंदोलनात झाली.