घाणेगावातून कामगार बेपत्ता

By | Updated: December 3, 2020 04:10 IST2020-12-03T04:10:23+5:302020-12-03T04:10:23+5:30

दुभाजकावर कचऱ्याची विल्हेवाट वाळूज महानगर : पंढरपुरातील रस्ता दुभाजकावर नागरिक व लगतचे व्यावसायिक कचरा आणून टाकत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी ...

Workers go missing from Ghanegaon | घाणेगावातून कामगार बेपत्ता

घाणेगावातून कामगार बेपत्ता

दुभाजकावर कचऱ्याची विल्हेवाट

वाळूज महानगर : पंढरपुरातील रस्ता दुभाजकावर नागरिक व लगतचे व्यावसायिक कचरा आणून टाकत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. वाऱ्याबरोबर हा कचरा रस्त्यावर पडत असल्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता होत आहे. रस्ता दुभाजकावर केर-कचरा टाकणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.

रांजणगावात वाहतूक कोंडी

वाळूज महानगर : रांजणगावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत असल्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक मोकळ्या जागेवर वाहने उभी करतात. या परिसरातील कॉम्प्लेक्समधील व्यावसायिक रस्त्यावर वाहने उभी करीत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पुलाच्या कामाला गती द्या

वाळूज महानगर : ए.एस.क्लब चौकातील पुलाचे काम संथगतीने सुरु असल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या चौकातून सोलापूर-धुळे महामार्ग जात असून, या ठिकाणी पूल उभारणीचे काम सुरु आहे. पुलाच्या कामासाठी लागणारे साहित्य घेऊन येणाऱ्या वाहनामुळे रस्ता जाम होत आहे. याचबरोबर धुळीमुळे ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकातून होत आहे.

पंढरपूर-पाटोदा रस्त्याची दुरवस्था

वाळूज महानगर : पंढरपूर पाटोदा या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिक व वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यात वाहने आदळून अपघातही घडत आहे. नागरिकांना बजाज गेटमार्गे वळसा टाकून ये-जा करावी लागत आहे. किमान या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी त्रस्त वाहनधारकांतून होत आहे.

Web Title: Workers go missing from Ghanegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.