कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By Admin | Updated: September 17, 2014 00:20 IST2014-09-17T00:19:13+5:302014-09-17T00:20:29+5:30

हिंगोली : तालुक्यातील कडती येथील भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत मंगळवारी काँग्रसेमध्ये प्रवेश केला.

Workers entered the Congress | कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

हिंगोली : तालुक्यातील कडती येथील भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत मंगळवारी काँग्रसेमध्ये प्रवेश केला. आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
आ. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश थोरात, पं. स. सदस्य दुलेखाँ पठाण, अशोक चव्हाण, माजी नगरसेवक गोपाल दुबे, विष्णू हनवते, किशोर पाटील उपस्थित होते. त्यानंतर आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी या कार्यकर्त्यांचा सत्कार केला.
कॉंग्रेसमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढला असून मागील दोन दिवसांत शेकडो कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. आपल्या कार्यकाळात शेतकरी व सामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविल्याचे सांगून भविष्यातही त्यासाठी झटणार असल्याचे आ.गोरेगावकर यावेळी म्हणाले.
(प्रतिनिधी)

Web Title: Workers entered the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.