योजनाच माहीत नसल्याने कामगार लाभांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:04 IST2021-05-10T04:04:12+5:302021-05-10T04:04:12+5:30
ज्या कामगारांना ईएसआयसी म्हणजेच राज्य कर्मचारी विमा सुरक्षेचा लाभ मिळतो, असे सर्व कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे ...

योजनाच माहीत नसल्याने कामगार लाभांपासून वंचित
ज्या कामगारांना ईएसआयसी म्हणजेच राज्य कर्मचारी विमा सुरक्षेचा लाभ मिळतो, असे सर्व कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे कामगारांना लाभ मिळावा, यासाठी संबंधित विभागाने स्वत: पुढाकार घ्यावा, या योजनांविषयी जनजागृती करून जास्तीत-जास्त कामगारांपर्यंत ही योजना पोहोचवावी आणि संबंधित कामगारांना ऑनलाईन अर्ज भरून देण्यासाठी मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा धारक कामगार संघटना आयटक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यासंदर्भात संघटनेने राज्य कर्मचारी विमा मंडळाच्या चिकलठाणा येथील शाखेत नुकतेच निवेदन दिले असून आर्थिक संकटात सापडलेल्या कामगारांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळवून द्या, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशाराही दिला. यावेळी विनोद फरकाडे, मधुकर खिल्लारे, विजय बोर्डे, शोभा ठोकळ, छाया पवार, मुकेश धायडे यांची उपस्थिती होती.