वंदेमातरम् सभागृहाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:04 IST2021-09-18T04:04:12+5:302021-09-18T04:04:12+5:30

वंदेमातरम् सभागृहाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करा --- औरंगाबाद : वंदेमातरम् सभागृहाचे काम पूर्णत्वास आले असून, सध्या अंतर्गत सजावट, ...

Work of Vandemataram Hall | वंदेमातरम् सभागृहाचे काम

वंदेमातरम् सभागृहाचे काम

वंदेमातरम् सभागृहाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करा

---

औरंगाबाद : वंदेमातरम् सभागृहाचे काम पूर्णत्वास आले असून, सध्या अंतर्गत सजावट, फर्निचरचे काही काम अपूर्ण आहे. येत्या तीन महिन्यांत सर्व कामे पूर्ण करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सभागृहाच्या बांधकामाची सामंत यांनी शुक्रवारी पाहणी केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, सिडकोच्या प्रशासक दीपाली मुधोळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आ. अंबादास दानवे यांचीही उपस्थिती होती. कंत्राटदार आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना शनिवारपासून एकही दिवस काम थांबवू नका, अशा सूचना देऊन कामे केलेली थकीत रक्कम लवकरच देण्यात येईल, तसेच लोकार्पणप्रसंगी आणखी काही दुरुस्तीची कामे करावी लागणार असल्याचे सामंत म्हणाले.

Web Title: Work of Vandemataram Hall