पाणंद रस्त्याचे काम रखडले; शेतकऱ्यांत संताप

By Admin | Updated: June 24, 2014 00:11 IST2014-06-24T00:11:35+5:302014-06-24T00:11:35+5:30

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील अनेक गावच्या पाणंद रस्त्यांना सन २०११ पासून प्रशासकीय मान्यता मिळून सुध्दा ते लाल फितीत अडकल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Work on the road of Panand; Fear of farmers | पाणंद रस्त्याचे काम रखडले; शेतकऱ्यांत संताप

पाणंद रस्त्याचे काम रखडले; शेतकऱ्यांत संताप

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील अनेक गावच्या पाणंद रस्त्यांना सन २०११ पासून प्रशासकीय मान्यता मिळून सुध्दा ते लाल फितीत अडकल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सन २०११ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांनी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व हे रस्ते गावांना जोडण्यासाठी पाणंद रस्त्यांची योजना राबवून अनेक कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. या योजनेमध्ये अनेक गावातील रस्ते हे रोहयोमधून करण्याचे ठरले होते. बऱ्याच रस्त्यांच्या कामाला गावोगाव सुरुवात सुध्दा करण्यात आली होती. परंतु मध्येच हे सर्व रस्ते अर्धवट स्थितीत पडून आहेत. आता हे रस्ते लोकवर्गणीतून तयार करा, असा सल्ला शासनाने दिल्याने व लोकवर्गणी भरण्यास कोणीच पुढे येत नसल्याने हे सर्व रस्ते शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु करावे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अक्षरश: चिखल तुडवत तारेवरची कसरत करावी लागते. या पाणंद रस्त्यांना तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन अर्धवट स्थितीत रखडलेले खडीकरणाचे कामांना मान्यता द्यावी, अशी मागणी सरपंच रघुनाथ कदम, विठ्ठल सवडे, दिगंबर सवडे, अवचितराव सवडे, श्रीराम उगले, शिवाजीराव बनकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
काम पूर्ण करण्याची मागणी
सन २०११ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व हे रस्ते गावांना जोडण्यासाठी पाणंद रस्त्यांची योजना राबवून अनेक कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Work on the road of Panand; Fear of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.