महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू

By Admin | Updated: February 3, 2017 00:57 IST2017-02-03T00:54:58+5:302017-02-03T00:57:43+5:30

जालना : जालना- औरंगाबाद महामार्गावरील रामतीर्थ स्मशानभूमी ते विशाल कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Work on the pavement on the highway continues | महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू

महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू

जालना : जालना- औरंगाबाद महामार्गावरील रामतीर्थ स्मशानभूमी ते विशाल कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
जालना बसस्थानक ते विशाल कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांचे मोठे हाल होत होते. विशेष म्हणजे होंडा शोरूमसमोरील रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने छोटे मोठे अपघातही येथे घडले होते. यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. खड्डे बुजविण्यासाठी अनेकवेळा मागणीही केली होती. परंतु सा.बां. विभाग मात्र, याकडे दुर्लक्ष करीत होती. अखेर गुरुवारी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळेल.

Web Title: Work on the pavement on the highway continues