जालना-भोकरदन रस्त्याचे काम लवकरच
By Admin | Updated: October 29, 2015 00:17 IST2015-10-29T00:08:11+5:302015-10-29T00:17:00+5:30
बदनापूर : जिल्हयातील महत्वाच्या अशा जालना-राजुर-भोकरदन रस्त्यासाठी ६२ कोटी रूपये मंजुर झाले आहे. पुढील महिन्यात या रस्त्याच्या कामाची सुरूवात करण्यात येणार

जालना-भोकरदन रस्त्याचे काम लवकरच
बदनापूर : जिल्हयातील महत्वाच्या अशा जालना-राजुर-भोकरदन रस्त्यासाठी ६२ कोटी रूपये मंजुर झाले आहे. पुढील महिन्यात या रस्त्याच्या कामाची सुरूवात करण्यात येणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सांंंगितले
बदनापूर येथे नगरपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. की, बदनापूर-जालना-भोकरदन ने आम्हाला मागण्या कमी व प्रत्येक वेळी भरभरून मत दिली. आता या शहरासाठी भरपूर विकास कामे करायची आहेत. राज्य व केंद्र सोडुन दया, बदनापूरात मात्र सेना-भाजप एक आहोत, नगर पंचायत आमच्या ताब्यात द्या, या शहराच्या विकासासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा शासनाकडुन उपलब्ध करून देईल. आता दिल्लीत पाणी न उपसणारी विहीर असुन मुंबई पर्यंत पाणी आणले आता खाली पाणी आणायचे असेल तर पाणी भरणारा बारेकरी चांगला पाहिजे.
सत्ता असल्यामुळे गेल्या १५ वर्षात केली नाही तेवढी विकास कामे एका वर्षात कामे केली आहे यामधे जनशताब्दी जालनाहुन आणली,४०० कोटीचे ड्रायपोर्ट,औरंगाबाद येथे १५०० कोटीची डिएमआयसी या दोन प्रकल्पामधे २२ किमी चे अंतर असुन जालना-औरंगाबाद लवकरच जुळे शहर होईल व तेव्हा बदनापूरला वेगळे महत्व येईल. जालना शहराच्या अंतर्गत सिमेंट रोडसाठी २० कोटी रूपये आणले असुन ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. १५० कोटी रूपये जालनासाठी अंतर्गत पाईपलाईनसाठी आणले जर जालनासाठी आम्ही निधी आणु शकतो. मग बदनापूरला आणता येणार नाही. का पुढच्या काळात ज्याप्रमाणे जालनाला निधी आणला त्याप्रमाणे बदनापूरलाही निधी आणु मागील ग्रामपंचायतमधे चांगले माणसे नसल्यामुळे केंद्र शासनाकडुन आणलेले राष्ट्रीय पेयजल योजनेचे ९ कोटी रूपये परत गेल्याचे ही त्यांनी यावेळी सांगीतले.
औरंगाबाद-नागपुर हा राष्ट्रीय महामार्ग बदनापूर शहराच्या बाहेरून नेण्यात येईल अशी ग्वाही शेवटी खा दानवे यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, आ नारायणराव कुचे, माजी आ संतोष सांबरे यांनीही बदनापूरच्या विकासासाठी युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी डॉ. भागवत कराड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे,आ नारायण कुचे, माजी आ. अरविंद चव्हाण, माजी आ. संतोष सांबरे, माजी आ. विलास खरात,भास्कर अंबेकर, बद्रीनाथ पठाडे, अवधुत खडके, हरीश्चंद्र शिंंदे, पद्माकर जऱ्हाड,निवृत्ती डाके उपस्थित होते.