शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

लघु व मध्यम उद्योगांसाठीच्या जयपूर औद्योगिक वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 20:02 IST

जमिनीचा १०० टक्के ताबा घेतल्यानंतर त्याठिकाणी पायाभूत सुविधा देण्याचे नियोजन ‘एमआयडीसी’ची अभियांत्रिकी शाखा करणार आहे.

ठळक मुद्देशेंद्र्यालगत उदयास येत असलेल्या ‘एमआयडीसी’साठी ८० टक्के भूसंपादन

- विजय सरवदे  औरंगाबाद : लघु व मध्यम उद्योगांना परवडतील या दरात भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी शेंद्र्यालगत १९२ हेक्टरवर नवीन जयपूर औद्योगिक वसाहत उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

वाळूज, शेंद्रा तसेच ‘डीएमआयसी’ या औद्योगिक वसाहतींमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथे भूखंडाचे दरही जास्त आहेत. याशिवाय वाळूज तसेच शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये आता भूखंड शिल्लक नाहीत. लघु- मध्यम उद्योगांना जास्तीच्या दरात भूखंड घेणे परवडत नाही. त्यासाठी लघु व मध्यम उद्योग डोळ्यांसमोर ठेवून जयपूर औद्योगिक वसाहत नव्याने विकसित केली जात आहे. याठिकाणी त्यांना परवडेल, अशा दरात भूखंड उपलब्ध करून दिले जातील. 

यासंदर्भात ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांनी सांगितले की, या ठिकाणी १८१ हेक्टर खाजगी व ११ हेक्टर सरकारी जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यापैकी जवळपास ८० टक्के जमिनीचा ताबा घेतला असून २० टक्के जमिनीचा मावेजा देणे बाकी आहे. जमिनीचा १०० टक्के ताबा घेतल्यानंतर त्याठिकाणी पायाभूत सुविधा देण्याचे नियोजन ‘एमआयडीसी’ची अभियांत्रिकी शाखा करणार आहे. उर्वरित मावेजाची रक्कम शासनाकडून लवकरच प्राप्त होईल, असे ‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक विभागातील उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी सांगितले. 

नवा बेल्ट विकसितऔरंगाबाद जिल्हा औद्योगिक विकासाच्या गतीवर मार्गक्रमण करण्याच्या दृष्टीने मागील काही वर्षांत जालना रोडवरील औद्योगिक परिसर विकसित झाला आहे. सुरुवातीला शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत निर्माण झाली. त्यानंतर आलेल्या डीएमआयसी आणि आॅरिक सिटीने या परिसराचे रुपच पालटून टाकले. बिडकीनचा परिसरही आकार घेत आहे. आता जयपूरची वसाहत अंतिम टप्प्यात आहे. 

आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘एमआयडीसी’औरंगाबादेतील दिल्ली-मुंबई इंड्रस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) ही आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उदयास येत आहे. याशिवाय मानगाव व सातारा येथेही अशाप्रकारची ‘एमआयडीसी’ उदयास येत आहे. देशातील ८ राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘एमआयडीसी’ उदयास येत असल्या तरी आपल्या राज्यातच अशा औद्योगिक वसाहतींचे काम पूर्ण झाले असून, प्लॉट वाटपही सुरू झाले आहेत. भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणाऱ्या औद्योगिक वसाहती वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. 

उद्योगांबाबतचे धोरण कॅबिनेटसमोर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त उद्योगांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील सर्व ‘एमआयडीसीं’साठी एक धोरण (पॉलिसी) निश्चित करण्यात आले असून, ते मंजुरीसाठी कॅ बिनेटसमोर ठेवले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यास मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा सहमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय