शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी कामाला लागा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:58 IST

गरज पडेल त्यावेळी मदत करण्यास मी तत्पर राहीन.

ठळक मुद्देगांधीभवन येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

औरंगाबाद : येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी आतापासूनच  कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी गांधी भवनात केले.

गांधीभवन येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, औरंगाबाद शहर हे आता मोठे शहर बनले आहे; परंतु २५ वर्षांपासून मी तोच पाण्याचा प्रश्न आणि जलवाहिनीचा प्रश्न ऐकतोय. आता कुठेतरी हे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महापालिकेवर संधी मिळाली पाहिजे. मी हे नांदेड महापालिकेत करून दाखविले आहे. औरंगाबादेतही हे शक्य आहे.  गरज पडेल त्यावेळी मदत करण्यास मी तत्पर राहीन. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याच्या मन:स्थितीत आपल्या नेत्या सोनिया गांधी नव्हत्या; परंतु महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची गरज असल्याचे आम्ही त्यांना पटवून दिले. त्या बैठकीला मी स्वतः होतो. त्यानंतर सोनिया गांधी यांनी या सत्ता स्थापनेला मान्यता दिली, हेही चव्हाण यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, प्रदेश पदाधिकारी अशोक सायन्ना, प्रकाश मुगदिया, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश नारनवरे आदींची भाषणे झाली. डॉ. पवन डोंगरे व नीलेश आंबेवाडीकर यांनी सूत्रसंचालन केले, हमद चाऊस यांनी आभार मानले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक