पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:10 IST2017-08-11T00:10:56+5:302017-08-11T00:10:56+5:30

औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट)चे काम सुरू झाले आहे. येत्या १५ ते २० दिवसांत पूर्ण रस्त्याचे अलायमेंट ठरेल

The work of DPR of Paithan road continues | पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम सुरू

पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम सुरू

विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट)चे काम सुरू झाले आहे. येत्या १५ ते २० दिवसांत पूर्ण रस्त्याचे अलायमेंट ठरेल. त्यानंतर गावे, नकाशे तयार होतील. रुंदीकरणाच्या आड येणाºया अडचणींची माहिती त्यानंतर समोर येईल.
डीपीआरचे काम करणाºया एजन्सीने प्राथमिक अहवाल दिला आहे. त्यानुसार शहराला पाणीपुरवठा करणाºया ७०० आणि १४०० मि. मी. व्यासाच्या विद्यमान पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीची अडचण आहे. रस्ता चौपदरी करण्यासाठी विद्यमान पाइपलाइन आहे तशीच ठेवणे अथवा भूसंपादन करून स्थलांतरित करणे किंवा रस्त्यासाठी भूसंपादन करणे. यापैकी कुठल्याही एका पर्यायांवर विचार करण्यात येणार आहे.
औरंगाबाद ते पैठण हा रस्ता एनएन क्रमांक २११ लगतच असणार आहे. शेंद्रा ते बिडकीन ते वाळूज असा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा ४५ कि़मी.पैकी अर्धा रस्ता रिंगरोडदेखील गणला जाईल. डीएमआयसी अंतर्गत शेंद्रा ते बिडकीन इंडस्ट्रीयल पार्क ते वाळूज औद्योगिक वसाहत या ‘इंडस्ट्री ट्रँगल’ साठी स्वतंत्र मार्ग बांधण्याचा प्रस्ताव नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे सुपूर्द करण्यात आला असून, ९०० कोटींचा हा प्रकल्प औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव या रस्त्यांसह १९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हे दोन्ही वेगवेगळे रस्ते असताना त्यांचा संयुक्त डीपीआर तयार होत आहे. ९०० कोटींचा शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज हा आठ पदरी मार्ग करणे प्रस्तावित आहे. शिवाय औरंगाबाद ते पैठण या चौपदरी मार्गाचेदेखील यात समायोजन झाले आहे. त्यासाठी भूसंपादनासह १ हजार कोटी लागण्याचा अंदाज आहे. सध्या ३० मीटर रुंद तो रस्ता आहे. ३० मीटर नव्याने भूसंपादन केल्यास तो रस्ता नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीच्या निकषाप्रमाणे पूर्ण करता येईल.
१९० किलोमीटरच्या कामाला १९०० कोटी रुपये भूसंपादनासह लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, पैठण ते औरंगाबाद डीपीआरचे काम सुरू झाले आहे.

Web Title: The work of DPR of Paithan road continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.