मद्यपी तरूणांकडून महिलांची छेडछाड
By Admin | Updated: April 22, 2015 00:40 IST2015-04-22T00:18:22+5:302015-04-22T00:40:51+5:30
बीड : रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी बीडचे बसस्थानक असुरक्षित बनले आहे. रात्री उशिरापर्यंत मद्यपींचे एक टोळकेच बसस्थानकात ठिय्या मांडून असते.

मद्यपी तरूणांकडून महिलांची छेडछाड
बीड : रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी बीडचे बसस्थानक असुरक्षित बनले आहे. रात्री उशिरापर्यंत मद्यपींचे एक टोळकेच बसस्थानकात ठिय्या मांडून असते. हे सर्वजण प्रवास करणाऱ्या महिलांची छेडछाड करतात. परंतु अधिकारी आणि पोलिसही याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
मागील काही दिवसांपासून बसस्थानकांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. रात्रीच्यावेळी काही मद्यपींसह टवाळखोरांचा बसस्थानकात वावर वाढला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांसाठी बीड बसस्थानक असुरक्षीत बनले आहे.
सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास काही मुली बसस्थानकातील प्लॅटफॉर्म नं ४ समोर उभ्या होत्या. त्यावेळी पाच ते सहा मद्यपींनी त्यांची छेड काढली. परंतु बसस्थानकात असलेल्या पोलीसांनीही हे सर्व घडत असताना त्याकडे दुर्लक्ष केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यास गेल्यानंतर दखल घेतली जात नसल्याचे यापूर्वीचे अनेक अनुभव असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. या मद्यपींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)