महिलांनी जाणून घेतल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या टिप्स
By Admin | Updated: August 9, 2014 01:09 IST2014-08-09T01:00:40+5:302014-08-09T01:09:00+5:30
औरंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे आयोजित व्याख्यानातून सखी मंचच्या सदस्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाच्या टिप्स जाणून घेतल्या. लोकमत

महिलांनी जाणून घेतल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या टिप्स
औरंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे आयोजित व्याख्यानातून सखी मंचच्या सदस्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाच्या टिप्स जाणून घेतल्या. लोकमत हॉलमध्ये रूपाली सावजी महिलांना अगदी सोप्या भाषेत व्याख्यान देताना म्हणाल्या की, जीवन जगताना एकदम मोठे ध्येय ठेवून मुलांवर दबाव आणू नका, जेणेकरून तोे गुणवत्तेपासून दूर जाईल. कारण योग्य नियोजन व स्मार्ट कामामुळेच यशप्राप्ती होते.
महिलांनी रोजच्या रोज आपल्या कामाचे टिपण ठेवा, घरात कोणत्या कामाला प्राधान्यक्रम द्यायचा हे विसरू नका, म्हणजे स्वत:साठीही वेळ काढता येईल आणि तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. तणावाखाली घरात काम करताना चिडचिड वाढते अन् दिवस कंटाळवाणा होऊन जातो.
सुट्यांचे नियोजन करून आनंदी परिवाराचे सूत्रही तुमच्याच हातात असल्याचेही रूपाली सावजी यांनी सांगितले, तर विशाल नरोटे यांनी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर बोलताना सांगितले की, जीवनात ताणतणाव मुक्तीसाठी तुम्ही स्वत:ला बदलण्याची गरज आहे. त्यालाच सर्वजण विचारतात मला कोणीही विचारत नाही, ही भावना मनातून काढून टाका. जुन्या जमान्यात तुम्हाला शेतीपूरक कामाविषयी तरबेज असावे लागायचे.
आता, संगणक व तांत्रिक ज्ञान असणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांना गुणवत्तेच्या दिशेने पाठविणे गरजेचे असून त्यासाठी मुलांच्या क्षमतेपेक्षा अपेक्षांचे ओझे लादू नका; जेणेकरून अपेक्षाभंग झाल्यास तणाव येतो. स्वप्न आणि वास्तव यातील फरक सांगून अगदी सोप्या भाषेत महिलांना व्यक्तिमत्त्व विकासाच्या टिप्स दिल्या.
कार्यक्रमाचे सहप्रायोजक डायमंड इन्स्टिट्यूट स्पोकन इंग्लिश असून, कार्यक्रमास सखी मंचच्या सचिव अनिता कोटगिरे यांची उपस्थिती
होती.