सत्तेत महिलांचा सहभाग वाढणार
By Admin | Updated: July 3, 2016 00:26 IST2016-07-03T00:11:19+5:302016-07-03T00:26:24+5:30
जालना : जिल्ह्यातील चार नगर पालिकांच्या विविध वार्डांतील आरक्षणाची सोडत शनिवारी काढण्यात आली. यामध्ये काही दिग्गजांना धक्के बसले

सत्तेत महिलांचा सहभाग वाढणार
जालना : जिल्ह्यातील चार नगर पालिकांच्या विविध वार्डांतील आरक्षणाची सोडत शनिवारी काढण्यात आली. यामध्ये काही दिग्गजांना धक्के बसले तर काही नव्या दमाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. आता जालना नगर पालिकेत ६१ पैकी तब्बल ३१ नगरसेवक महिला राहणार आहेत. त्यामुळे पालिकेतील सत्तेत महिलांचा सहभाग वाढणार आहे.
जालना नगर परिषद निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात वार्ड संरचना करण्यात येऊन दुसऱ्या टप्प्यात प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ८, अनुसूचित जमातीसाठी १, ओबीसीसाठी १६ प्रभाग राखीव झाले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती ४ महिला, अनुचित जाती जमाती गटातील एक, इतर मागासवर्गीय ८ महिला, सर्वसाधारण प्रवर्गातील १८ महिला मिळून एकूण ३१ महिलांसाठी प्रभाग राखीव झाले आहेत. यंदा प्रथमच नगर परिषदेत महिलांची संख्या पुरूषांच्या तुलनेत एकने अधिक राहणार आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकर चिंचकर, मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यानुसार सवंर्गनिहाय काढण्यात आलेले आरक्षण खालीलप्रमाणे
अनुसूचित जाती प्रवर्ग
प्रभाग - २ अ, प्रभाग - ४ अ (महिला), प्रभाग -१८ अ (महिला), प्रभाग -२६ अ (महिला), प्रभाग -२७ अ, प्रभाग -२८ अ, प्रभाग - २९ अ (महिला), प्रभाग - ३० अ
अनुसूचित जमाती प्रवर्ग
प्रभाग - १७ अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), प्रभाग - १ अ (महिला), प्रभाग - ३ अ (महिला), प्रभाग - ७ अ, प्रभाग - ९ अ, प्रभाग - १० अ, प्रभाग - ११ अ (महिला), प्रभाग - १२ अ, प्रभाग-१३ अ, प्रभाग - १५ अ, प्रभाग - १६ अ (महिला), प्रभाग - १९ अ (महिला), प्रभाग - २० अ (महिला), प्रभाग - २१ अ, प्रभाग - २२ अ, प्रभाग - २४ अ (महिला), प्रभाग - २५ अ (महिला).
सर्वसाधारण प्रवर्ग
प्रभाग - १ ब, प्रभाग - २ ब (महिला), प्रभाग -३ ब, प्रभाग -४ ब, प्रभाग - ५ अ (महिला), प्रभाग - ५ ब, प्रभाग - ६ अ (महिला), प्रभाग- ६ ब, प्रभाग -७ ब (महिला), प्रभाग - ७ क (महिला), प्रभाग - ८ अ (महिला), प्रभाग - ८ ब, प्रभाग - ९ ब (महिला), प्रभाग - १० ब (महिला), प्रभाग - ११ ब, प्रभाग - १२ ब (महिला), प्रभाग - १३ ब (महिला), प्रभाग - १४ अ (महिला), प्रभाग - १४ ब, प्रभाग - १५ ब (महिला), प्रभाग - १६ ब, प्रभाग - १७ ब, प्रभाग - १८ ब, प्रभाग - १९ ब, प्रभाग - २० ब, प्रभाग - २१ ब (महिला), प्रभाग - २२ ब (महिला), प्रभाग - २३ अ (महिला), प्रभाग - २३ ब, प्रभाग - २४ ब, प्रभाग - २५ ब, प्रभाग - २६ ब, प्रभाग - २७ ब (महिला), प्रभाग - २८ ब (महिला), प्रभाग - २९ ब, प्रभाग - ३० ब (महिला).
जालना शहरातील दिग्गजांचे वार्ड सुरक्षित राहिल्याने आगामी काळात निवडणूक चुरशीची
होण्याची चिन्हे आहेत. तर भोकरदन, परतूर आणि अंबड दिग्गजांचे वार्ड आरक्षित झाल्याने त्यांचे
राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे.
पालिकांचे आरक्षण/२
जालना नगर पालिकेत सहा वॉर्ड वाढले असून, एकूण ६१ वॉर्ड झाले आहेत. यापैकी तब्बल ३१ वॉर्ड महिलांसाठी राखीव आहेत. म्हणजेच पुरुषांपेक्षा एक महिला नगरसेवक अधिक असणार आहे. सत्तेत महिलांचा वाढणार असल्याने प्रशासन गतिमान होण्याची शक्यता व्यक्त केली जात
आहे.
शहरात सहा वॉर्डांची भर पडणार असली तरी यामध्ये शहराबाहेरील परिसराचा समावेश राहणार आहे. त्यामुळे या भागातील मतदारांनाही महत्व येणार आहे.
निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांचे लक्ष्य आता वॉर्ड पुनर्रचनेकडे लागले आहे.
४गुगल मॅपिंगद्वारे वॉर्ड पुनर्रचनेचे काम पूर्णत्वास आले असून अंतिम मान्यता ही विभागीय आयुक्त देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.