महिलेच्या गळ्यातील दागिने पळविले
By Admin | Updated: March 22, 2017 00:18 IST2017-03-22T00:16:18+5:302017-03-22T00:18:36+5:30
लातूर : लातूर शहरातील उटगे नगर भागात आपल्या घरासमोरील अंगणात झोपलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली.

महिलेच्या गळ्यातील दागिने पळविले
लातूर : लातूर शहरातील उटगे नगर भागात आपल्या घरासमोरील अंगणात झोपलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली. याबाबत गांधी चौक पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस तपास करीत आहेत.
भारतबाई गुडाप्पा कानडे या आपल्या अंगणात झोपल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील बोरमाळ व गंठण काढून पोबारा केला. याबाबत गांधी चौक पोलिसात तक्रार देण्यात आली असून, पोलीस तपास करीत आहेत.