महिलेचे लॉकेट लंपास
By Admin | Updated: May 13, 2015 00:26 IST2015-05-13T00:22:02+5:302015-05-13T00:26:14+5:30
कळंब : शहरातील दत्तनगर भागातील एका महिलेचे दोन तोळे सोन्याचे लॉकेट चोरट्यांनी पळवून नेले़ ही घटना सोमवारी दुपारी घडली असून, या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील दत्तनगर भागातील आरती सतीश लुणावत यांच्या घरी दोन अज्ञात इसमांनी तुमच्याकडील तांब्याची, पितळ्याची भांडी घासून देतो असे म्हणत प्रवेश केला. त्या अज्ञात इसमांनी भांडे घासण्याचा बहाणा करीत लुणावत यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे अंदाजे ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट हिसकावून पळ काढला़ याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर विश्वास टाकून त्यांना घरात प्रवेश देवू नये, तसेच अशा व्यक्तींविरुद्ध संशय आल्यास तात्काळ पोलिसांना सुचना द्याव्यात, असे आवाहन पोनि चंद्रकांत साबळे यांनी केले आहे. (वार्ताहर)