दर महिन्याला होणार महिलांची आरोग्य तपासणी

By Admin | Updated: May 25, 2014 01:06 IST2014-05-25T00:46:43+5:302014-05-25T01:06:58+5:30

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या वतीने मातृत्व संवर्धन हा उपक्रम हाती घेतला आहे. यातून प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

Women's Health Checkup to be done every month | दर महिन्याला होणार महिलांची आरोग्य तपासणी

दर महिन्याला होणार महिलांची आरोग्य तपासणी

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या वतीने मातृत्व संवर्धन हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तपासणीअंती गरज असलेल्या महिलांना औषधोपचारही पुरविले जाणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र चालविली जात आहेत. आता याच केंद्रांच्या माध्यमातून ‘मातृत्व संवर्धन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदरील उपक्रमाच्या माध्यमातून त्या-त्या आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या गावांतील गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. हे शिबीर प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला घेतले जाणार आहे. शिबिरात सहभागी होणार्‍या महिलांना आवश्यक सेवा मिळाव्यात यासाठी त्या-त्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स आणि सर्व कर्मचार्‍यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. हाश्मी यांनी दिली. हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)शासनाच्या वतीने गरोदर व स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींसाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु, अनेकांना अशा योजनांची माहिती नसते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचत नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर आता ‘मातृत्व संवर्धन’ या उपक्रमाच्या माध्यमातून अशा योजनांचीही माहिती दिली जाणार आहे.

Web Title: Women's Health Checkup to be done every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.