जलसंधारणासाठी महिलांचे परिश्रम
By Admin | Updated: April 16, 2017 23:05 IST2017-04-16T23:02:17+5:302017-04-16T23:05:06+5:30
केज : तालुक्यातील वरपगावचा पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग झाला असून, महिलांनी जलसंधारणाच्या कामामध्ये आपले योगदान दिले आहे

जलसंधारणासाठी महिलांचे परिश्रम
केज : तालुक्यातील वरपगावचा पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग झाला असून, महिलांनी जलसंधारणाच्या कामामध्ये आपले योगदान दिले आहे. वृक्षरोपणासाठी २३०० खड्ड्यांचे उद्दिष्ट समोर ठेवून त्यास रविवारी प्रारंभ झाला.
जलसंधारणाबरोबर वृक्ष लागवड मोहिमेवर यंदा लक्ष केंद्रित केले असून, गाव स्तरावर कामे होऊ लागली आहेत. युवा ग्राम सेवाभावी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली महिलांनीही श्रमदान सुरू केले आहे. कामाचा दर्जा टिकवण्यासाठी वॉटर कप स्पर्धेचे नियम पाळले जात आहेत. शोषखड्डे, वृक्षारोपण, बंधारे दुरूस्ती, शेततळे या कामांसाठी प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी एच. पी. देशमुख, बन्सीधर देशमुख, दिलीप देशमुख, साहेबराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, आशा देशमुख आदींचे मार्गदर्शन लाभत आहे. (वार्ताहर)