पं.स.वर धडकला महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:07 IST2017-08-19T00:07:04+5:302017-08-19T00:07:04+5:30

मनरेगाची कामे सुरु करण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी १० गावातील महिलांनी १८ आॅगस्टरोजी महाराष्ट्र राज्य शेतमजूर व लाल बावटाच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.

 The women's front run on p | पं.स.वर धडकला महिलांचा मोर्चा

पं.स.वर धडकला महिलांचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : मनरेगाची कामे सुरु करण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी १० गावातील महिलांनी १८ आॅगस्टरोजी महाराष्ट्र राज्य शेतमजूर व लाल बावटाच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
सुकाणू समितीचे कॉ.विलास बाबर व राजेभाऊ राठोड यांच्यावर दाखल झालेले गुन्हे वापस घ्यावेत, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात कॉ. दीपक लिपने, कॉ.अशोक बुरखुंडे, भारत गायकवाड, सुदाम आगळे, शंभूदेव रोकडे, कविता आव्हाड, भगवान राठोड, सर्जेराव खंडाळे, उद्धव सर्जे, गणेश निसर्गंध, बाळासाहेब गिराम यांच्या शेकडो जण सहभागी झाले होते.

Web Title:  The women's front run on p