शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

Women's Day Special : पतीच्या आत्महत्येनंतर दोन लेकरांना जगविण्याच्या जिद्दीने मिळाले बळ : वैशाली येडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:31 IST

वैशाली यांचा सहभाग असलेले आत्महत्याग्रस्त विधवा आणि शेतकऱ्यांच्या लेकीचं ‘तेरवं’ हे नाटक लक्षवेधून घेत आहे

- राम शिनगारे

औरंगाबाद : आम्ही अल्पभूधारक शेतकरी. दुष्काळ पाचवीलाच पूजलेला. नवऱ्याकडे खाजगी सावकाराचे कर्ज. शेतीत काहीच पिकत नसल्यामुळे सावकारांनी कर्जाच्या परतफेडीसाठी लावलेल्या तगाद्यामुळे नवऱ्याने आत्महत्या केली. मी नुकतीच बाळांतीण झालेली. दीड वर्षाचा मुलगा, एक महिन्याची मुलगी. तीन जीव कसे जगवणार असा प्रश्न होता. पण दोन लेकरांना जगविण्याच्या जिद्दीने आणि मेहनतीमुळे खडतर प्रवास सुरळीत सुरू असल्याचे वैशाली येडे यांनी सांगितले.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या यावर्षीच्या उद्घाटक आंतरराष्ट्रीय लेखिका नयनतारा सहगल यांचे आमंत्रण ऐनवेळी रद्द केल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी पत्नीच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राजूर येथील वैशाली येडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून परिचित झालेल्या वैशाली यांचा सहभाग असलेले आत्महत्याग्रस्त विधवा आणि शेतकऱ्यांच्या लेकीचं ‘तेरवं’ हे नाटक महिला दिनानिमित्त एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात शुक्रवारी दुपारी होणार आहे. यानिमित्ताने वैशाली येडे यांचा जीवनप्रवास जाणून घेतला.

पतीच्या मृत्यूची वार्ता येताच पायाखालची जमीन हादरली. पोरगा दीड वर्षाचा, मुलगी एक महिन्याची. तीन जिवांना काय खाऊ घालावे? कसे जगवावे? असे अनेक प्रश्न समोर होते. वडिलांनी वर्षभर मदत केली. या वर्षाच्या कालावधीत शिवणकाम शिकले. वडिलांनी एक मशीन घेऊन दिली. २०१३ मध्ये दोन लेकरं घेऊन सासरी राहण्यास आले. घरातील लोक मदत करण्यास तयार नव्हते. याच वेळी अंगणवाडीत सेविका म्हणून अर्ज निघाले होते. अर्ज भरल्यानंतर नोकरी लागली. अंगणवाडी सेविकेच्या नोकरीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीसह शिवणकाम सुरूच ठेवले. वेळ मिळेल तेव्हा दुसऱ्याच्या शेतात रोजंदारी सुरू केली. घरातील लोक लेकरं देऊन गाव सोडून जा म्हणून दबाव टाकत होते. त्यास ठाम नकार दिला. याच वेळी यवतमाळच्या एका संस्थेशी संबंध आला. त्या संस्थेत महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत होते. मीही त्यात प्रशिक्षण घेतले. त्यात काही मशीन मिळाल्या. यातून आत्मविश्वास बळावत गेला. त्यानंतर एकल महिला किसान संघटनेत सहभाग घेतला. तेथे अनेक एकल महिलांची भेट झाली. भेटलेल्या महिलांपेक्षा आपले दु:ख कमी असल्याची जाणीव झाली. पुढे नाम फाऊंडेशनने एकल महिलांना मदत वाटप केली. त्यात मला लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे समन्वयक हरीश इथापे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर १५ हजारांची मदत मिळाली. तेव्हाच हरीश इथापे यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि शेतकऱ्यांच्या लेकींना घेऊन ‘तेरवं’ या नाट्यातून शेतकऱ्यांची परिस्थिती समाजापुढे मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. 

पती गेला तेव्हा बाळंतपणासाठी माहेरीवैशाली यांचे २००९ साली लग्न झाले. त्यांना त्याच वर्षी ३१ डिसेंबर रोजी एक मुलगा झाला. पतीसह त्या शेतात राबत होत्या. त्या कालावधीतील दोन वर्षात शेतात कष्ट करूनही उत्पन्न मिळाले नाही. शेतात खर्च करण्यासाठी बँकेकडून कर्जही मिळाले नाही. त्यासाठी खाजगी सावकाराकडून नवऱ्याने पैसे घेतले. भरमसाठ व्याजामुळे पैसे जास्त झाले. माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा ७० ते ८० हजार रुपये व्याजाचे होते. पण पतीने आत्महत्या केल्यानंतर अनेक जण म्हणत होते की आमचेही पैसे आहेत म्हणून. पतीने २ आॅक्टोबर २०११ रोजी आत्महत्या केली. तेव्हा बाळंतपणासाठी माहेरी होते. २४ आॅगस्ट २०११ रोजी मुलगी झाली होती.

जगण्याच बळ पंखात भरल २०११ साली दीड वर्षाचा मुलगा, एक महिन्याची मुलगी. पतीची आत्महत्या. अशा कठीण परिस्थितीतून सुरू झालेला प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. आज जगण्याचे बळ पंखात भरलेले आहे. अंगणवाडीत नोकरी, शिवणकाम, एकल महिला किसान संघटना, नाम फाऊंडेशनसह ‘तेरवं’ नाट्यातून अभिनयापर्यंत मजल मारली आहे.- वैशाली येडे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिलाAurangabadऔरंगाबाद