महिला काँग्रेसचे थाळीनाद आंदोलन

By Admin | Updated: January 9, 2017 23:42 IST2017-01-09T23:40:49+5:302017-01-09T23:42:28+5:30

उस्मानाबाद : केंद्र शासनाने घेतलेल्या नोटबंदी निर्णयाच्या निषेधार्थ जिल्हा महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने सोमवारी उस्मानाबादमध्ये थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

Women's Congress's Thalinad movement | महिला काँग्रेसचे थाळीनाद आंदोलन

महिला काँग्रेसचे थाळीनाद आंदोलन

उस्मानाबाद : केंद्र शासनाने घेतलेल्या नोटबंदी निर्णयाच्या निषेधार्थ जिल्हा महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने सोमवारी उस्मानाबादमध्ये थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
केंद्र सरकाराने नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांसह शेतमजूर, महिला बचतगट, लहान-मोठ्या उद्योजगांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडले आहे. असे असतानाही शासनाकडून ठोस उपायोजना केल्या जात नाहीत. पन्नास दिवसानंतर परिस्थिती सुधारेल, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. परंतु, अपेक्षित सुधारणा कुठेही पहावयास मिळत नाही. शासनाच्या या धोरणाविरूद्ध सोमवारी महिला काँग्रेसच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन मोर्चा काढला. तसेच थाळीनाद आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनामुळे परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष डॉ. राजलक्ष्मी गाकयवाड, उमरग्याच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, जिल्हा प्रभारी उषा कांबळे, माजी जि.प. अध्यक्षा गोदावरी केंद्रे, सरचिटणीस सुरेखा काशिद, तालुकाध्यक्षा कल्पना मगर, शहराध्यक्षा अ‍ॅड. ज्योती बडेकर, अ‍ॅड. वैशाली देशमुख, शेख, रेहमुन्नीसा शेख, प्रतिमा देशमुख, मुमताज शेख, लंका बनसोडे, शमा शेख, निळघर यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Women's Congress's Thalinad movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.