पाण्यासाठी महिला पालिकेवर धडकल्या
By Admin | Updated: July 8, 2014 01:00 IST2014-07-07T22:51:40+5:302014-07-08T01:00:39+5:30
जालना: अंबड रस्त्यावरील यशोदीप नगरातील संतप्त महिलांनी पिण्याच्या पाण्यासह अन्य मुलभूत सोयी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी सोमवारी नगरपालिकेवर धडक मारली.

पाण्यासाठी महिला पालिकेवर धडकल्या
जालना: अंबड रस्त्यावरील यशोदीप नगरातील संतप्त महिलांनी पिण्याच्या पाण्यासह अन्य मुलभूत सोयी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी सोमवारी नगरपालिकेवर धडक मारली.
अंबड रस्त्यावरील यशोदीपनगरात ८० ते १०० घरे आहेत. दहा वर्षांपासून या भागात नागरिक वास्तव्यास आहेत, परंतु नगरपालिका प्रशासनाने या भागास पिण्याच्या पाण्यासह अन्य कोणत्याही मुलभूत सोयीसुविधा पुरविल्या नाहीत. त्यामुळेच संतप्त महिलांनी सोमवारी थेट पालिका कार्यालयावर धडक मारली. सीमा खरात, सुनीता निकाळजे, कमल चव्हाण, कस्तुरा इंगोले, स्वाती वाहुळकर, आशा हिवाळे, मनीषा खिल्लारे, योगीता पवार, अनसूया पवार, डॉ. माधवी देशमुख, अर्चना खाडे, श्रद्धा खाकरे, तारामती शिनगारे, मनीषा साबळे, विद्या देशमुख, नीता देशमुख, रेणुका पाचफुले, नीता टोपे, ज्योती खरात, मालती गोफणे, कांचन हिवाळे, त्रिशाला लबडे, सुमंत अहेर, उर्मिला वळेकर, प्रज्ञा मोरे, अरुणा पवार यांच्यासह शेकडो महिलांनी या कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी केली. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले. त्याद्वारे या भागात अंतर्गत रस्ते नाहीत. सांडपाण्याची विल्हेवाट लागावी म्हणून नाल्या नाहीत. नळ नाहीत. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागात विद्युत खांब उभारण्यात आले, परंतु त्यास जोडणी नाही, दिवेही नाहीत, अंधारातच ये- जा करावी लागते. पावसाळ्यात तर चिखलमय रस्त्यावरुन कसरती कराव्या लागतात, असे या महिलांनी नमूद केले. मुलांसह आबालवृद्धांचा किमान विचार करुन पालिका प्रशासनाने तात्काळ सोयी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी या महिलांनी केली. महिलांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)
रुपनगरवासियांचाही ठिय्या
अंबड चौफुली भागातील रुप नगर विठ्ठल रुक्मीणी मंदिर परिसरातील संतप्त महिलांनी पालिका कार्यालय गाठून आपले गाऱ्हाणे मांडले. सहा वर्षांपासून नळांद्वारे सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नाही. वसाहतीत नवीन बांधकामे झाली. परंतु आपापल्या सोयीनुसार अनेकांनी कनेकशन करुन घेतले.
त्यामुळे ठिक ठिकाणी पाणीपुरवठा बंद किंवा विस्कळीत झाला आहे. या संदर्भात नगरसेवकांसह पालिका प्रशासना वारंवार सांगून सुद्धा दखल घेतली नाही. अशी खंत अरुणा टकले, अंबिका शंकरपेल्ली, छाया पाथरकर, कविता ठोंबरे, पद्मा मस्के, सुनीता पाफळ, कीर्ती मोरे, अंजली पालवे, शोभा पालवे, राधा सोळे, वर्षा जाधव, छाया कुलकर्णी, सुवर्णा कुलकर्णी, कौशल्या भालेकर, सुनंदा अवचार, केशरबाई कदम, राधा कोरडे, जयश्री अनिल परदेशी, रेखा गायकवाड, आशा काळे, अलका पाटील, सुरेखा पाथरकर, संगीता जाधव, भारती डोईफोडे, श्रृती शेळके, वर्षा सोनवणे, साक्षी पाटील सोनम पवार, दिश वाघमारे, सुशीला डिघोळे आदींनी केली.प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी निवेदनाद्वारे महिलांनी मागणी केली.