महिलांनी घडविला कलाविष्कार
By Admin | Updated: September 6, 2014 00:42 IST2014-09-06T00:33:03+5:302014-09-06T00:42:54+5:30
लोकमत सखी मंच आयोजित ‘सुखकर्ता उत्सव महाराष्ट्राचा’ या स्पर्धा सोहळ्यात सखी मंच सदस्यांनी बक्षिसांची लयलूट केली.

महिलांनी घडविला कलाविष्कार
औरंगाबाद : कलात्मकतेचे दर्शन घडवणारी रांगोळी व मोदकांची सजावट, नित्यनेमाने केलेल्या पाठांतरासह शुद्ध वाणीचा परिचय करून देणारे श्लोकपठण... आणि अभिनेता सचिन खेडेकर व कलाकारांशी झालेला मुक्त संवाद... लोकमत सखी मंच आयोजित ‘सुखकर्ता उत्सव महाराष्ट्राचा’ या स्पर्धा सोहळ्यात सखी मंच सदस्यांनी बक्षिसांची लयलूट केली.
घरोघरीच्या गृहिणींच्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या महालक्ष्मी सजावट, मोदक सजावट, श्लोक पठण व रांगोळी स्पर्धेत सखी मंच सदस्यांनी आपल्या विविधांगी कौशल्याचा प्रत्यय देत बक्षिसेही जिंकली.
सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, अध्यक्षा रेखा राठी, सखी मंचच्या सचिव अनिता कोटगिरे, कमिटी सदस्य गीता अग्रवाल, पद्मजा मांजरमकर, अरुणा काबरा यावेळी उपस्थित होत्या. महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे अनुराधा लिंबेकर व ब्रम्हे यांनी परीक्षण केले. श्लोक पठण स्पर्धेसाठी द्वारकानाथ जोशी व श्रीकांत देशपांडे, मोदक बनवा स्पर्धेसाठी प्रज्ञा सुमंत व मीना पांडे, रांगोळी स्पर्धेसाठी सीमा वानखेडे व मुक्ता मुदिराज यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधत अपंग व मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या शाळांमधील शिक्षकांचा सचिन खेडेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात स्वयंसिद्धा संचलित विवेकसिंह शाळेतील कलाशिक्षिका सुनंदा गवळी, संगणक शिक्षिका सीमा रसाळ व श्वेता मराठे, ओंकार बालवाडीतील ‘विहंग विंग’च्या अनिता जोशी, श्रद्धा जोशी, रोहिणी धोंगडे, तारामती बाफना अंध विद्यालयाच्या प्राचार्या संध्या कलंत्री, मीना रत्नपारखी व उत्कर्ष कर्णबधिर संस्थेतील कलाशिक्षिका धनश्री गोडसे यांचा समावेश होता.
यावेळी सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे प्रायोजक सोनचाफा ज्वेलर्स होते, तर इतर स्पर्धांच्या बक्षिसांचे प्रायोजकत्व डेकोर झोनने स्वीकारले होते. सोनचाफाचे सागर मांडले व डेकोर झोनच्या प्रियंका जावळे उपस्थित होत्या.
खेडेकर यांच्यासह चित्रपटाचे निर्माते अनिकेत कर्णिक, अभिनेते विनीत शर्मा, गीतकार एम. प्रकाश, संगीतकार दिलीप सेन उपस्थित होते. नीता पानसरे यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले.
स्पर्धांमधील विजेत्या
महालक्ष्मी सजावट स्पर्धा- प्रथम : पूजा टेहेरे, द्वितीय : अंजली दलाल, तृतीय : सुनीता भाले, उत्तेजनार्थ : शुभांगी दांडगे, अर्चना देशपांडे, शिल्पा सानप, रेणुका घुले व कोमल भागवतकर
मोदक बनवा स्पर्धा- प्रथम : अर्चना वैष्णव, द्वितीय : पुष्पा मेघावाले, तृतीय : कीर्ती चिंतामणी
श्लोक पठण स्पर्धा- प्रथम : कल्याणी जोशी, द्वितीय : सुलभा परळीकर, तृतीय : शालिनी जोशी
रांगोळी स्पर्धा- प्रथम : शिल्पा सानप, द्वितीय : शरयू सोनवणे, तृतीय : अमिता लेकुरवाळे
गुरुंमुळेच मी घडलो -सचिन खेडेकर
सचिन खेडेकर यांनी आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेल्या गुरूंमुळेच मी घडलो, अशी भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, शिक्षक दिन हे गुरूंबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचे सुंदर निमित्त आहे.
चांगली मराठी कलाकृती मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी हा माझा प्रयत्न असतो.
आज मराठी सिनेमाने वेगळी वाट चोखाळली आहे, त्याचे श्रेय सुजाण मराठी प्रेक्षकालाच जाते. खाकी वर्दीतल्या पोलिसांतील संवेदनशील माणूस ‘गुलाबी’ मधून दिसेल.