अवैध धंदे बंदसाठी महिला सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 00:02 IST2017-06-28T00:00:22+5:302017-06-28T00:02:55+5:30
हिंगोली : तालुक्यातील सांडसतर्फे बासंबा येथे शालेय परिसरात दारूविक्री होत असल्याबाबत महिलांनी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनास २७ जून रोजी निवेदन दिले.

अवैध धंदे बंदसाठी महिला सरसावल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील सांडसतर्फे बासंबा येथे शालेय परिसरात दारूविक्री होत असल्याबाबत महिलांनी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनास २७ जून रोजी निवेदन दिले.
शालेय परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी शिक्षण समितीचे अध्यक्ष आनंदराव देवकर यांनी बासंबा पोलिसांकडे केली होती. परंत अद्याप कारवाई झाली नाही. त्यामुळे मंगळवारी अवैधधंदे बंदच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर आनंदराव देवकर, सुशीलाबाई मिटकर, प्रयागबाई मिटकर, गंगुबाई मिटकर, शांताबाई मिटकर, शांताबाई मानोकर, रेख देवकर, सिनाबाई वायकुळे, पारूबाई देवकर, अनिता देवकर, गयाबाई धनवे, अनुसया देवकर, वैजनाथ वायकुळे, शिवाजी देवकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.