महिलेचा विनयभंग करणाऱ्यास अटक
By Admin | Updated: May 21, 2015 00:28 IST2015-05-21T00:15:32+5:302015-05-21T00:28:12+5:30
जालना : घराच्या दरवाजाच्या फटीतून हात घालून कडी उघडत वाईट हेतूने मध्यरात्री दोन वाजता घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना जाफराबाद शहरातील साठेनगरात घडली.

महिलेचा विनयभंग करणाऱ्यास अटक
जालना : घराच्या दरवाजाच्या फटीतून हात घालून कडी उघडत वाईट हेतूने मध्यरात्री दोन वाजता घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना जाफराबाद शहरातील साठेनगरात घडली.
मयुर कैलासचंद खंडेलवाल असे त्या आरोपीचे नाव असून तो मागील काही दिवसांपासून रात्री अपरात्री लोकांच्या दरवाजातून झोपलेल्या महिला व मुलींना पाहत असे. मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास एका घरात असेच डोकावून पाहुन त्याने घराच्या दरवाजाची कडी हात घालुन उघडली व त्या घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केला. त्या महिलेने आराडा ओरड केल्याने तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच लोकांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी त्याच्या विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयील कोठडी सुनावण्यात आली. त्याची हर्सुल कारागृहात रवानगी केली.
परतूर: आष्टी रेल्वे गेटवर एका साठ वर्षीय इसमास मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला. याप्रकरणी परतूर पोलिसात दोन अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी रेल्वे गेटवर लक्ष्मण विठ्ठलराव झरेकर (वय ६०) हे दि. १९ रोजी दुपारी २ वाजता मोबाईलवर बोलत असताना अज्ञात दोघा जणांनी झरेकर यांना लाकडाने मारहाण करून एक हजार रू. किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. या प्रकरणातील आरोपींचा तपास लागला असून त्यांच्याकउून मोबाईल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.