महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

By Admin | Updated: July 6, 2015 00:18 IST2015-07-06T00:13:43+5:302015-07-06T00:18:26+5:30

उस्मानाबाद : भांडी घासत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना रविवारी दुपारी शाहूनगर भागात घडली असून,

The woman's mangulutu was snuffed out | महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

महिलेचे मंगळसूत्र हिसकावले


उस्मानाबाद : भांडी घासत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना रविवारी दुपारी शाहूनगर भागात घडली असून, दुचाकीस्वार दोन चोरट्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहूनगर भागात राहणाऱ्या वत्सला विकास सुरते या रविवारी दुपारी घरासमोर भांडी घासत होत्या़ त्यावेळी तेथे आलेल्या दोन दुचाकीस्वार युवकांनी ‘शिलानगर कोठे आहे’ असा पत्ता विचारत त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हातोहात लंपास केले़ घटनेनंतर वत्सला सुरते यांनी आरडाओरड केली़ मात्र, तोपर्यंत चोरटे तेथून पोबारा झाले होते़ या प्रकरणी वत्सला सुरते यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तपास सपोनि बगाड हे करीत आहेत़
शहरात यापूर्वी चैैन स्नेचिंगचे साधारणत: दहा ते बारा प्रकार घडले आहेत़ या घटनांचा तपास अद्याप गुलदस्त्यात असताना पुन्हा चैैनस्नेचिंग झाल्याने महिला वर्गात खळबळ उडाली आहे़ पोलिसांनी चैैनस्नेचिंग करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़
ाहरातील आठवडी बाजारातून मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीनेही सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहे़ मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सातत्याने सुरू असून, रविवारच्या आठवडी बाजारात पुन्हा एक मोबाईल लंपास झाला आहे़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती़ दरम्यान, पोलिसांनी मोबाईल चोरांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़

Web Title: The woman's mangulutu was snuffed out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.