घरात घुसून महिलेची छेडछाड
By Admin | Updated: August 21, 2014 00:12 IST2014-08-21T00:01:41+5:302014-08-21T00:12:45+5:30
औरंगाबाद : घरात घुसून महिलेची छेड काढून तिला धमकावणाऱ्या आरोपीला बेगमपुरा पोलिसांनी अटक केली.

घरात घुसून महिलेची छेडछाड
औरंगाबाद : घरात घुसून महिलेची छेड काढून तिला धमकावणाऱ्या आरोपीला बेगमपुरा पोलिसांनी अटक केली.
घटनेबाबत फौजदार सुभाष हिवराळे यांनी सांगितले की, बेगमपुरा परिसरातील मॅक्स टॉवर येथे राहणारी एक ३० वर्षीय महिला सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता घरात काम करीत होती. त्याच वेळी शेजारी राहणारा आरोपी महंमद फईम महंमद सलीम (३२) याने दरवाजा ठोठावला. महिलेने दरवाजा उघडताच आरोपी थेट घरात घुसला आणि त्याने छेड काढण्यास सुरुवात केली. या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली. तेव्हा तिचा पती धावत आला. तेव्हा धमक्या देत महंमद फईमने तेथून पळ काढला.
या प्रकारानंतर महिलेने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंदविताच पोलिसांनी त्याला अटक केली. फौजदार हिवराळे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.