महिलेचा पतीच निघाला खूनी

By Admin | Updated: February 18, 2015 00:42 IST2015-02-18T00:39:03+5:302015-02-18T00:42:06+5:30

वाशी : तालुक्यातील कन्हेरी जवळील डोंगरपायथ्याशी बारा दिवसांपूर्वी एका ४० वर्षीय महिलेचा खून करून प्रेत फेकल्याचा प्रकार उघडकीस आला होता़

The woman's husband left the murderer | महिलेचा पतीच निघाला खूनी

महिलेचा पतीच निघाला खूनी


वाशी : तालुक्यातील कन्हेरी जवळील डोंगरपायथ्याशी बारा दिवसांपूर्वी एका ४० वर्षीय महिलेचा खून करून प्रेत फेकल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ दरम्यान, या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, सदरील महिलेचा खून हा तिच्या पतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने तशी कबुलीही दिल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, लग्नाला महिन्याचा कालावधी लोटण्यापूर्वीच हा खुनाचा प्रकार घडला आहे.
हाडोंग्री रस्त्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरील लालबावटा डोंगर पायथ्याला निर्जनस्थळी एका ४० वर्षीय अज्ञात महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह ५ फेब्रुवारी रोजी गुराख्यांना आढळला होता. सदरील घटना त्याने सायंकाळी पोलीस पाटीलांना सांगितली़ पोलीस पाटलांनी ६ फेब्रुवारी रोजी वाशी पोलीस ठाण्याला माहिती दिली़ माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शहाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसिंंग चव्हाण यांनी डोंगरपायथ्याशी जाऊन पाहणी केली़ छिन्न-विछिन्न अवस्थेत अज्ञात महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता़ मृतदेहा शेजारी एक मफ लर व रक्ताने माखलेला दगड आढळून आला होता़ त्यावरून सदरील महिलेचा खून झाल्याचा कयास पोलिसांनी लावीत, खूनाचा गुन्हा दाखल केला होता़
तपासादरम्यान हा खून संजय जगन्नाथ वाघमारे (४५ रा.जांब बावी, ता.भूम ह.मु.नवी मुंबई (वाशी)) याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. प्रिती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलिसांच्या पथकाने मुंबई येथून त्याला जेरबंद केले़ त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मुंबईत गवंडी, रंगारी काम करीत असताना दूर नात्यातीलच बीड येथील विवाहित असलेल्या कमल नामक महिलेशी २० जानेवारी रोजी भोनगिरी (ता़भूम) विवाह केला होता़ विवाहानंतर पत्नी कमल ही नात्यातील कोणासही बोलल्यानंतर संशयाने पाहून भांडणे करीत होती़ ‘कोणास बोलला तर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेईन, तु मला जाळून मारलेस’ अशी तक्रार देण्याची धमकीही देत होती़
लग्नाला एक महिना लोटण्यापूर्वीच पत्नी अशी वागू लागल्यानंतर ती नीट जगू देणार नसल्याचे मनात आल्याने तिचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेत, तिला कन्हेरी (ता.वाशी) येथे जाऊ म्हणून २ फ ेब्रुवारीस तिला गोड बोलून कन्हेरीकडे आणले़ मात्र, वाटेत आल्यावर ‘मला तुझ्या नातेवाईकाकडे जायचे नाही’ म्हणून भांडणास सुरूवात केली़ तिला गोड बोलून लालबावटा नावाच्या डोंगरपायथ्याजवळ नेहून तिचा मफलरने गळा आवळून खून केल्याची कबुली संजय जगन्नाथ वाघमारे याने पोलिसांना दिली आहे़ (वार्ताहर)
मयत महिला ही बीड येथील रहिवाशी असल्याचे समजते़ या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोना उपकेंद्र कुलकर्णी यांना प्रथत: सुगावा लागला होता़ प्रकरणाचा उलगडा करण्याकामी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनीही प्रशासनाला सहकार्य केल्याचे समजते़ पोनि शहाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्याना दहा दिवसात प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले. दरम्यान, संजय जगन्नाथ वाघमारे याने आपल्या नातेवाईकांच्या मध्यस्थीने बीड येथील कमल नामक महिलेशी विवाह केला होता़

Web Title: The woman's husband left the murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.