अपहरण करून महिलेचे कापले केस

By Admin | Updated: December 24, 2016 21:54 IST2016-12-24T21:50:53+5:302016-12-24T21:54:18+5:30

ब्ाीड : पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन एका महिलेचे अपहरण केले.

Woman's Cut Off Case by Hijacking | अपहरण करून महिलेचे कापले केस

अपहरण करून महिलेचे कापले केस

ब्ाीड : पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन एका महिलेचे अपहरण केले. त्यानंतर तिच्या डोक्यावरील केस कापून मारहाण केल्याची घटना शनिवारी येथे उघडकीस आली.
पीडित महिला शहरातील मोमीनपुरा भागातील मोहम्मदिया कॉलनीत वास्तव्यास आहे. तिने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. गेवराई येथील एका व्यक्तीसोबत पीडित महिलेचे अनैतिक संबंध होते या संशयावरून हा सारा प्रकार घडला आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती संबंधित व्यक्तीस भेटायला शहरातील एका खासगी दवाखान्यात गेली होती. तेव्हा त्याच्या पत्नीने आपल्या तीन नातेवाईकांना सोबत घेऊन जबरदस्तीने रिक्षात बसवून गेवराई येथे नेले. तेथे केस कापून जवळील मोबाईल, पर्स, मंगळसूत्र असा साडेआठ हजार रूपयांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर मारहाण करून तेलगाव नाका येथे आणून सोडले. आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे फौजदार बी. व्ही. झिंजुर्डे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Woman's Cut Off Case by Hijacking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.