‘त्या’ महिलेच्या मृत्यूचे गुढ वाढले
By Admin | Updated: March 23, 2016 01:03 IST2016-03-23T00:38:13+5:302016-03-23T01:03:18+5:30
परतूर : ‘त्या’ महिलेच्या मृत्यूतील गूढ वाढले असून, पोलिसांनी चुकीने रूग्णवाहिका चालकावरच गुन्हा दाखल केला आहे. मूळ आरोपी मात्र रूग्णालयातून पळून गेल्याचे पुढे आले आहे.

‘त्या’ महिलेच्या मृत्यूचे गुढ वाढले
परतूर : ‘त्या’ महिलेच्या मृत्यूतील गूढ वाढले असून, पोलिसांनी चुकीने रूग्णवाहिका चालकावरच गुन्हा दाखल केला आहे. मूळ आरोपी मात्र रूग्णालयातून पळून गेल्याचे पुढे आले आहे.
येथील एका महाविद्यालयात पदवी परीक्षेसाठी अर्चना किशोर सातपुते (२८ वर्षे रा. भिवंडी ह. मु. मानवत जि. परभणी) ही महिला पेपर देण्यासाठी १४ मार्च रोजी आली होती. पेपर सुटल्यानंतर मोटार सायकलवर मागे बसून जातांना परतूर ते सातोना रोडवर मापेगाव पूनर्वसनजवळ सदर चालकाने गाडी हलगर्जीपणे चालवून अचानक ब्रेक दाबल्याने सदर महिला गाडीवरून पडून गंभीर जखमी
झाली.
उपचारादरम्यान या महिलेचा १६ मार्च रोजी मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी जखमी महिलेस नेण्यास आलेल्या १०८ रूग्णवाहिकेच्या चालक पांडुरंग रूस्तुमराव मोगल यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. मूळ आरोपी सदर महिलेस जालना येथील एका हॉस्पिटलमध्ये सोडून पळून गेला.