महिला कर्मचाऱ्याने प्रशासनाला मागितली मरणाची परवानगी
By Admin | Updated: March 30, 2017 23:39 IST2017-03-30T23:35:52+5:302017-03-30T23:39:24+5:30
बीड : वाढीव वेनश्रेणीचे लाभ मिळविण्यासाठी समाजकल्याण विभागात आत्मदहानाचा प्रयत्न केलेल्या महिला कर्मचारी अरुणा तुरुकमारे यांनी थकित वेतनासाठी जि.प. प्रशासनाकडे थेट मरणाची परवानगी मागितली आहे.

महिला कर्मचाऱ्याने प्रशासनाला मागितली मरणाची परवानगी
बीड : वाढीव वेनश्रेणीचे लाभ मिळविण्यासाठी समाजकल्याण विभागात आत्मदहानाचा प्रयत्न केलेल्या महिला कर्मचारी अरुणा तुरुकमारे यांनी थकित वेतनासाठी जि.प. प्रशासनाकडे थेट मरणाची परवानगी मागितली आहे.
अरुणा तुरुकमारे या पिंपरगव्हाण रोडवरील अविनासी मतिमंद शाळेत सफाईकामगार पदावर कार्यरत होत्या. त्यांना शिपाईपदी पदोन्नती मिळाली;पण वाढीव वेतनश्रेणीनुसार लाभ दिले नाहीत. त्यामुळे महिला दिनी अरुणा तुरुकमारे यांनी जि.प. समाजकल्याण अधिकारी सुनील तुंबारे यांच्यासमोर अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचे एका महिन्याचे वेतन देण्यात आले; परंतु मागील वेतन व वाढीव वेतनश्रेणीचा लाभ काही मिळाला नाही. त्यांनी वारंवार कार्यालयात चकरा मारुनही प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी जि.प. प्रशासन व समाजकल्याण विभागाला निवेदन देऊन थेट मृत्यूची परवानगी मागितली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत प्रभारी समाजकल्याण अधिकारी रवींद्र तुरुकमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. (प्रतिनिधी)