देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेची बॅग लांबविली
By Admin | Updated: June 30, 2017 23:27 IST2017-06-30T23:24:53+5:302017-06-30T23:27:09+5:30
वसमत : येथील गवळी मारोती मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या स्कूटीच्या डिकीतील बॅग चोरट्यांनी लांबविली. बॅगेत २५ हजार रुपये रोख, दोन मोबाईल व अन्य साहित्य असा ऐवज होता.

देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेची बॅग लांबविली
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथील गवळी मारोती मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या स्कूटीच्या डिकीतील बॅग चोरट्यांनी लांबविली. बॅगेत २५ हजार रुपये रोख, दोन मोबाईल व अन्य साहित्य असा ऐवज होता. वसमत शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
वसमत येथील गीताबाई लालपोतू या शनिवारी सकाळी १० वाजता त्यांचे दुकान उघडण्यासाठी दुकानाच्या चाव्या असलेली बॅग स्कूटीच्या डिकीत टाकून निघाल्या. रस्त्यावर स्कूटी उभी करून मंदिरात गेल्या. दर्शन करून बाहेर येईपर्यंत त्यांची बॅग चोरट्यांनी लांबवली. राष्ट्रीय महामार्गावर भररस्त्यावर घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडवून दिली आहे. याप्रकरणी गीताबाई यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तपास पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल करत आहेत.