विद्यापीठातील स्त्री (अभ्यास केंद्र) उपेक्षितच
By Admin | Updated: August 10, 2016 00:27 IST2016-08-10T00:10:38+5:302016-08-10T00:27:16+5:30
औरंगाबाद : मानव्य इमारतीत तळमजल्यावर एका बाजूला असलेल्या एकाच खोलीत कारकून काम करीत आहे, तिथेच शिकविण्याचे कामही चालू आहे

विद्यापीठातील स्त्री (अभ्यास केंद्र) उपेक्षितच
औरंगाबाद : मानव्य इमारतीत तळमजल्यावर एका बाजूला असलेल्या एकाच खोलीत कारकून काम करीत आहे, तिथेच शिकविण्याचे कामही चालू आहे, आतील बाजूस असलेल्या क्युबिकल्समध्ये संशोधक विद्यार्थी अभ्यास करत आहेत, हे चित्र आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राचे.
महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे जनक म. जोतिबा फुले यांचा पुतळा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर आहे. स्त्रियांंना त्यांचे हक्क मिळविण्यासाठी घटनात्मक तरतूद करणाऱ्या ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यापीठाला नाव आहे तिथे स्त्री अभ्यास केंद्राची उपेक्षा चालू असल्याचे दिसते. २०१० साली विद्यापीठाने प्रसिद्ध स्त्रीवादी कार्यकर्त्या ताराबाई शिंदे यांच्या नावाने स्त्री अभ्यास केंद्र स्थापन केले. प्रा. डॉ. वंदना सोनाळकर या पहिल्या संचालक राहिल्या. त्यामुळे हे केंद्र अर्थशास्त्र विभागाला लागून असलेल्या एका खोलीत सुरूझाले. संचालकांना बसण्यासाठी एक खोली आणि इतर प्राध्यापक, कार्यालय, संशोधक, ग्रंथालय हे सर्व एका खोलीत अशा पद्धतीने विश्वाचे ज्ञान देणाऱ्या विद्यापीठात हे केंद्र चालू आहे. एखाद्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयालाही लाजवेल, असा हा शिक्षणाचा प्रवास मागील सहा वर्षांपासून विद्यापीठात सुरूआहे.