‘त्या’ महिलेचा ‘स्वॅब पॉझिटीव्ह’
By Admin | Updated: March 5, 2015 00:01 IST2015-03-04T23:55:16+5:302015-03-05T00:01:18+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील तेर येथील एका महिलेचा श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला होता़

‘त्या’ महिलेचा ‘स्वॅब पॉझिटीव्ह’
उस्मानाबाद : तालुक्यातील तेर येथील एका महिलेचा श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला होता़ या महिलेचा ‘स्वाईन’ तपासणीसाठी घेण्यात आलेला ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ तर तालुक्यातीलच पानवाडी येथील एका महिलेचा निमोनियाने मृत्यू झाला असून, त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत़
तेर येथील कविता काळे (वय-२७) या महिलेस मंगळवारी सकाळच्या सुमारास श्वासोच्छवास घेताना त्रास होवू लागल्याने गावातीलच ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ प्रथमोपचारानंतर रूग्णवाहिकेतील व्हेंटीलेटर लावून त्यांना जिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले होते़ मात्र, त्यावेळी ‘स्वाईन’ची तपासणी करण्यासाठी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता़ तसेच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते़ मात्र, दुपारच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़ बुधवारी सायंकाळी त्यांच्या स्वॅबचा अहवाल जिल्हा रूग्णालयास प्राप्त झाला असून, तो पॉझिटीव्ह आल्याचे रूग्णालयीन सूत्रांनी सांगितले़ तर तालुक्यातील पानवाडी नम्रता मोहिते (वय-३२) या महिलेस उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ चाचणीनंतर निमोनिया झाल्याचा अहवाल आला होता़ मात्र, उपचार सुरू असताना काही काळातच त्यांचा मृत्यू झाला़ त्या उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांचाही ‘स्वॅब’ घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़ दरम्यान, दोन महिलांच्या मृत्यूनंतर स्वाईनचे स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत़ चाचणी अहवालानंतर त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे़