महिलेला सुरीने जबर मारहाण
By Admin | Updated: May 11, 2016 00:25 IST2016-05-11T00:22:48+5:302016-05-11T00:25:20+5:30
वाशी : एका महिलेला सुरीने जबर मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्यांविरुद्ध सोमवारी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना वाशी तालुक्यातील लोणखस पारधीपिढीवर घडली़

महिलेला सुरीने जबर मारहाण
वाशी : एका महिलेला सुरीने जबर मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्यांविरुद्ध सोमवारी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना वाशी तालुक्यातील लोणखस पारधीपिढीवर घडली़
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील बोरलोणी पारधी पेढीवरील चंदाबाई श्रीमंत शिंदे यांना काहींनी दुचाकीवरून लोणखस पारधी पिढी येथे नेले़ त्यावेळी तेथील इसमांनी ‘श्रीकंत कोठे आहे’ अशी विचारणा करीत शिवीगाळ केली़ त्यावेळी चंदाबाई शिंदे यांनी शिवीगाळ करू नका, माझ्या मुलीला त्रास का देता असे म्हणताच तेथे असलेल्या इसमांनी सुरीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद चंदाबाई शिंदे यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिली़ चंदाबाई शिंदे यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध सोमवारी वाशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ बोबडे हे करीत आहेत़ (वार्ताहर)