महिलेने रिक्षाचालकाला चोपले चपलेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:04 IST2021-09-13T04:04:12+5:302021-09-13T04:04:12+5:30
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नव्हती. सलीम अली सरोवर रस्त्यावर अचानक रिक्षातून उतरलेल्या महिलेने ...

महिलेने रिक्षाचालकाला चोपले चपलेने
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नव्हती. सलीम अली सरोवर रस्त्यावर अचानक रिक्षातून उतरलेल्या महिलेने रिक्षाचालकाला शिवीगाळ करीत चांगलाचा इंगा दाखविला. यावेळी रिक्षाचालकाला त्या महिलेने चपलांनी चोपण्यास सुरुवात केली. ही घटना पाहून अनेक वाहनचालक तेथे थांबले. त्यांच्यापैकी कुणीतरी या घटनेची मोबाईलवर व्हिडिओ क्लिप तयार केली. ‘ द्या याला फटके, मारा त्याला मारा’, असे लोक म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यावेळी महिलेकडून चपलेचा मार खाल्यानंतर तो रिक्षाचालक तेथून सुसाट निघून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रिक्षाचालक आणि महिलेचा नेमका काय वाद होता. कोणत्या कारणावरून महिलेने रिक्षाचालकाला भररस्त्यात बदडले, हे मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार आली नसल्याचे सिटी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले.