महिलेने ठाण्यातच अंगावर ओतले रॉकेल
By Admin | Updated: February 25, 2017 00:28 IST2017-02-25T00:25:40+5:302017-02-25T00:28:59+5:30
बीड : दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु, त्याला जेलमध्ये पाठवा म्हणत महिलेने ग्रामीण ठाण्यात गोंधळ घालत चक्क अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला

महिलेने ठाण्यातच अंगावर ओतले रॉकेल
बीड : दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्याला बीड ग्रामीण पोलिसांनी महिलेच्या तक्र ारीवरु न ताब्यात घेतले. परंतु, त्याला जेलमध्ये पाठवा म्हणत महिलेने ग्रामीण ठाण्यात गोंधळ घालत चक्क अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
बीड तालुक्यातील नामलगाव येथील सुरेखा शिंदे या महिलेला गावातीलच भरत भगवान कदम या तळीरामाने बुधवारी रात्री शिवीगाळ केली. शिंदे यांनी याबाबत बीड ग्रामीण पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक अनंत जगताप यांच्या सूचनेवरून पोलिसांनी भरत कदम याला सकाळी ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरु असताना शुक्रवारी सायंकाळी सुरेखा शिंदे या ग्रामीण ठाण्यात आल्या. कदम यांना जेलमध्ये पाठवा म्हणत त्यांनी ठाण्यात गोंधळ घातला. सोबत आणलेल्या बाटलीतून अंगावर रॉकेल आतून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, महिला कर्मचाऱ्यांनी त्यांनी वेळीच रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक गणेश गावडे यांनी ग्रामीण ठाण्यास भेट देऊन महिलेची समजूत काढली. योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण मिटले. त्यानंतर पोलिसांनी महिलेला तिच्या घरी पाठविले. (प्रतिनिधी)