ऑक्सिजन पातळी ४० असलेली महिला २० दिवसांत घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:04 IST2021-05-19T04:04:01+5:302021-05-19T04:04:01+5:30

औरंगाबाद : ऑक्सिजन पातळी ४० असलेली कोरोनाग्रस्त महिला २० दिवसांत कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन घरी गेली. अतिशय गंभीर ...

A woman with an oxygen level of 40 at home in 20 days | ऑक्सिजन पातळी ४० असलेली महिला २० दिवसांत घरी

ऑक्सिजन पातळी ४० असलेली महिला २० दिवसांत घरी

औरंगाबाद : ऑक्सिजन पातळी ४० असलेली कोरोनाग्रस्त महिला २० दिवसांत कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन घरी गेली. अतिशय गंभीर परिस्थितीत असणाऱ्या सदर कोरोना रुग्णाला बरे करण्यात मेडिकव्हर हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. श्रीकांत सहस्रबुद्धे आणि त्यांच्या पथकाला यश मिळाले.

कोरोनाची लागण झाल्यामुळे ३५ वर्षीय महिला उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली. प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाइकांनी महिलेला मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळेस महिलेची ऑक्सिजन पातळी केवळ ४० होती. तेव्हा डॉ. श्रीकांत सहस्रबुद्धे आणि त्यांच्या पथकाने घशामधून नलिका टाकून अत्याधुनिक व्हेंटिलेशनच्या मदतीने आणि रुग्णाला १६ ते २० तास उलटे झोपवून (प्रोन पोझिशन) प्रकृती सामान्य करण्याचा प्रयत्न केला. सामान्यतः जेव्हा रुग्ण व्हेंटिलेटरवर असतो आणि त्याच्या घशातून ऑक्सिजनचा पुरवठा दिला जातो, त्या वेळेस त्याला पालथे झोपवणे खूप अवघड असते. कारण रुग्णाच्या शरीरात बऱ्याच नळ्या टाकलेल्या असतात आणि उलटे झोपवताना नळ्या निघण्याची भीती असते; पण तरीही डॉ. सहस्रबुद्धे आणि त्यांच्या पथकाने हे काम अतिशय काळजीपूर्वक करून दाखविले. अशा परिस्थितीमध्ये सायटोकाइन स्टॉर्मचे प्रमाण वाढते. डॉ. सहस्रबुद्धे यांनी नवीन औषधीचा वापर करून ते कमी केले आणि २० दिवसांत सदर रुग्ण बरा होऊन घरी गेला.

डॉ. श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, ज्यात ते रोज रुग्णाच्या नातेवाइकांचेसुद्धा समुपदेशन करतात आणि रुग्णाची परिस्थिती कशी आहे, हे त्यांना रोज कळवितात. अशाच परिस्थितीत असणाऱ्या बऱ्याच रुग्णांना बरे करून घरी पाठविण्यात डॉ. श्रीकांत सहस्रबुद्धे आणि त्यांच्या पथकाला यश आले आहे. यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या केंद्र प्रमुख डॉ. नेहा जैन, डॉ. विजय पठाडे, डॉ. संतोष यादव, डॉ. विशाल कुटे आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे.

Web Title: A woman with an oxygen level of 40 at home in 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.