महिला फौजदाराचीच काढली छेड, रिक्षाचालकाला अटक
By Admin | Updated: June 6, 2017 00:54 IST2017-06-06T00:52:06+5:302017-06-06T00:54:51+5:30
औरंगाबाद : राँगसाईडने जाणाऱ्या लोडिंग रिक्षाचालकाला थांबविणाऱ्या महिला फौजदाराचीच त्या रिक्षाचालकाने छेड काढली

महिला फौजदाराचीच काढली छेड, रिक्षाचालकाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राँगसाईडने जाणाऱ्या लोडिंग रिक्षाचालकाला थांबविणाऱ्या महिला फौजदाराचीच त्या रिक्षाचालकाने छेड काढल्याची खळबळजनक घटना रविवारी दुपारी पुंडलिकनगर रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ घडली.
पोलिसांनी त्या रिक्षाचालकास अटक केली आहे. शिवाजी दिनकर सुरसे (रा. न्यू हनुमाननगर) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. हनुमाननगर पाण्याच्या टाकीसमोरून आरोपी हा त्याची लोडिंग रिक्षा राँग साईडने वेगात नेत असताना महिला फौजदाराच्या वाहनाला कट मारला असता त्यांनी त्यास थांबवून त्याचे वाहन पुंडलिकनगर पोलीस चौकीत नेले.
तेथे आरोपीने अश्लील वर्तन केल्यावरुन आरोपीविरुद्ध विनयभंग करणे, राँग साईडने वाहन चालविणे आदी कलमान्वये सुरसेविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.