मुरूड येथील तलावात महिलेचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: March 26, 2017 23:25 IST2017-03-26T23:22:06+5:302017-03-26T23:25:50+5:30
मुरुड : बसस्थानकाच्या पाठीमागील परिसरात असलेल्या तलावात एका महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली

मुरूड येथील तलावात महिलेचा बुडून मृत्यू
मुरुड : बसस्थानकाच्या पाठीमागील परिसरात असलेल्या तलावात एका महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. आशा विष्णू जाधव (४२, रा. जोडजवळा, ता. लातूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला शुक्रवारच्या रात्री तलावात पडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत. लातूर तालुक्यातील जोडजवळा येथील आशा विष्णू जाधव ही महिला गेल्या सात-आठ वर्षांपासून मुरुड बसस्थानकात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवीत होती. या महिलेचा बसस्थानकातच मुक्काम होता. शिवाय, ती मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी ही महिला तलावाच्या काठावर गेली असावी. त्यादरम्यान तोल जाऊन ती तलावात पडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तलावाच्या बाहेर काढला. शुक्रवारच्या रात्री ही महिला तलावात पडली असावी, असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.