दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: July 28, 2016 01:03 IST2016-07-28T00:18:49+5:302016-07-28T01:03:43+5:30
बीड : वडिलांसाठी कुरड्या व पापड्या घेऊन बेलुरा येथे माहेरी येणाऱ्या एका महिलेचा दुचाकीवरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बेलुरा येथे बुधवारी दुपारी घडली.

दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू
बीड : वडिलांसाठी कुरड्या व पापड्या घेऊन बेलुरा येथे माहेरी येणाऱ्या एका महिलेचा दुचाकीवरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बेलुरा येथे बुधवारी दुपारी घडली.
सुनीता रमेश शेळके (४५, रा. सैदापूर, ता. गेवराई) असे त्या महिलेचे नाव आहे. त्यांचे माहेर बेलुरा आहे. पुतण्या मंगेशसोबत दुचाकीवरून त्या नारायणगड मार्गे येत होत्या. घाट संपल्यानंतर इंग्रजी शाळेजवळच्या वळणावर पावसाने रस्ता निसरडा झाला होत्या, त्यावरून दुचाकी घसरली. हातातील सामानामुळे त्यांना स्वत:ला सावरता आले नाही. खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला.
परिसरातील लोकांनी त्यांना एका जीपमधून उपचारसाठी बीडकडे हलविले. परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पित्याची भेटही अधुरीच राहिली. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. सायंकाळी सैदापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)