शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरला घरी बोलावून महिलेचे अश्लील चाळे, पतीने व्हिडिओकरून मागितली ५ लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 18:17 IST

डॉक्टरला सात तास घरात कोंडले; महिलेसह कुटुंबाचा कट, दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : तपासणीचे नाटक करून डॉक्टरला उपचारासाठी घरी बोलावून खोलीत नेत आक्षेपार्ह कृत्य करून महिलेसह तिच्या कुटुंबाने ब्लॅकमेल केले. मोबाइलमध्ये चित्रीकरण करून ५ लाखांची खंडणी मागत खिशातील ७८ हजार रुपये लुटले. डॉक्टरने या घटनेनंतर हर्सूल पोलिसांकडे तक्रार करताच महिलेसह तिच्या संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शकुंतला सांडू लहाने (४०), सांडू लहाने (४७, दोघे रा. हरसिद्धी माता मंदिराच्या मागे, हर्सूल), शकुंतलाचा जावई गणेश भालकर व त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खुलताबाद तालुक्यातील ५० वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टरांशी २८ मे रोजी महिलेने संपर्क साधला होता. एका पायाने चालता येत नाही. त्यासाठी आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असून, डॉक्टरांना घरी येण्याची विनंती शकुंतलाने केली. सकाळी ११.३० वाजेपर्यंत डॉक्टर लहानेच्या घरी पोहोचले. शकुंतला आतील खोलीत होती. डॉक्टर तपासणीसाठी आत जाताच तिने त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पती सांडूने मोबाइलमध्ये त्याचे चित्रीकरण करून आरडाओरडा सुरू केला. डॉक्टरांनी तसे न करण्याची विनंती केली. मात्र, दोघांनी व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी ५ लाखांच्या खंडणीची मागणी केली.

सात तास घरात कोंडलेहा धिंगाणा सुरू असतानाच शकुंतलाचा जावई, मुलगी तेथे पोहोचले. त्यांनी डॉक्टरला धमकावत खिशात हात घालून शेतीच्या साहित्यासाठी आणलेले ७८ हजार रोख काढून घेतले. जागेवर आणखी पैशांची मागणी केल्याने डॉक्टरांनी ऑनलाइन ८ हजार रुपये पाठवले. परत गुरुवारपर्यंत पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांनी डॉक्टरला घरात कोंडून धमकावले.

गुन्हा दाखल होताच महिला पसारडॉक्टरांनी याप्रकरणी हर्सूलच्या निरीक्षक डॉ. सुनीता मिसाळ यांच्याकडे तक्रार केली. त्यात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच शकुंतला, तिची मुलगी पळून गेल्या. उपनिरीक्षक गणेश केदार यांनी तिचा जावई गणेश भालकर (२८, रा. चेतनानगर) व पती सांडूला अटक केली. न्यायालयाने त्यांना २ दिवस पाेलिस कोठडी सुनावली. या कुटुंबाने आणखी कोणाला असे लुटलेय का, याचा तपास सुरू असल्याचे केदार यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी