शेतात खोदकाम केल्याच्या वादातून महिलेला मारहाण

By | Updated: November 28, 2020 04:05 IST2020-11-28T04:05:09+5:302020-11-28T04:05:09+5:30

महिलेच्या तक्रारीवरुन हर्सूल ठाण्यात तीन आरोपीविरूध्द मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंबादास धरमलाल चव्हाण, प्रकाश धरमलाल चव्हाण ...

Woman beaten over digging in field | शेतात खोदकाम केल्याच्या वादातून महिलेला मारहाण

शेतात खोदकाम केल्याच्या वादातून महिलेला मारहाण

महिलेच्या तक्रारीवरुन हर्सूल ठाण्यात तीन आरोपीविरूध्द मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंबादास धरमलाल चव्हाण, प्रकाश धरमलाल चव्हाण आणि अंकुश गेमा चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे महिलेचे नातेवाईक आहेत.

=====================

अपघातास कारणीभूत दुचाकीस्वार विरोधात गुन्हा

औरंगाबाद: भरधाव दुचाकीच्या धडकेत मोहम्मद मसूद अयुब सिद्दीकी (५५, ग्रीन व्हॅली) हे दुचाकीस्वार जखमी झाले. ऑक्टोबर महिन्यात हर्सूल टी पॉईंट जवळ हा अपघात झाला. याप्रकरणी मोहम्मद मसूद यांच्या तक्रारीवरून २५ नोव्हेंबर रोजी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

=============

--

जुगार खेळणाऱ्यावर कारवाई

औरंगाबाद: रेल्वेस्थानक परिसरातील राजीवनगर झोपडपट्टी येथे सोरट जुगार खेळवणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. आरोपी मंगेश मारुती भालेराव (२८) विरूध्द वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार शिवाजी भोसले यांनी ही कारवाई केली.

--=============

अवैध दारु विकणारा अटकेत

औरंगाबाद : दुचाकीवर बेकायदा देशी दारुची वाहतूक करतांना आशिष शिवनारायण जैस्वाल (२३, रा. सातारा परिसर) यास गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून ४ हजार ९९२ रुपये किमतीची देशी दारूसाठा आणि दुचाकी जप्त केली. गुन्हे शाखेचे पोलीस नाईक राजेंद्र साळुंके यांच्या फिर्यादीवरून आशिष विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

==============

Web Title: Woman beaten over digging in field