लांडग्याने पाडला चार शेळ्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:06 IST2021-05-05T04:06:01+5:302021-05-05T04:06:01+5:30

पिशोर : येथून काही अंतरावर असलेल्या मोहाडी शिवारात शेळ्यांवर लांडग्यांनी हल्ला केला. यात चार शेळ्यांचा लांडग्याने फ़डशा पाडला. तर ...

The wolf killed four goats | लांडग्याने पाडला चार शेळ्यांचा फडशा

लांडग्याने पाडला चार शेळ्यांचा फडशा

पिशोर : येथून काही अंतरावर असलेल्या मोहाडी शिवारात शेळ्यांवर लांडग्यांनी हल्ला केला. यात चार शेळ्यांचा लांडग्याने फ़डशा पाडला. तर दोन गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

मोहाडी येथील विलास सांडू गायकवाड यांची गट क्रमांक ३१ मध्ये शेती असून या ठिकाणी त्यांनी शेळ्यांसाठी गोठा बनविला आहे. रविवारी सायंकाळी चारा पाणी करून गायकवाड हे घरी निघून गेले. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात आले असता चार शेळ्या मृतावस्थेत दिसून आल्या. तर दोन गंभीर अवस्थेत पडलेल्या होत्या. लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात या शेळ्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी देखील याच परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र त्यावर उपाययोजना केल्या जात नाही. तर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देखील मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

Web Title: The wolf killed four goats