सुरक्षारक्षकाविना रोकडे नेणारे दोघे पकडले
By Admin | Updated: September 17, 2015 00:32 IST2015-09-16T23:58:26+5:302015-09-17T00:32:06+5:30
बीड: एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी दुचाकीवर २१ लाख रुपयांची रोकड चक्क दुचाकीवरुन व विना सुरक्षा रक्षकाशिवाय घेऊन जाणाऱ्या दोघांना वाहतूक पोलिसांनी

सुरक्षारक्षकाविना रोकडे नेणारे दोघे पकडले
बीड: एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी दुचाकीवर २१ लाख रुपयांची रोकड चक्क दुचाकीवरुन व विना सुरक्षा रक्षकाशिवाय घेऊन जाणाऱ्या दोघांना वाहतूक पोलिसांनी बुधवारी दुपारी पकडले. चौकशी अंती त्या दोन व्यक्तींना पोलीस उपअधीक्षक गणेश गावडे पाटील यांनी तंबी देऊन सोडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्व एटीएममशीनमध्ये पैसे भरण्याचे कंत्राट एका कंपनीस देण्यात आले आहे. त्या कंपनीचे कर्मचारी बँकेतून लाखो रुपयांची रोकड घेतात. चार चाकी वाहनात दोन कर्मचारी व एक बंदुकधारी गार्डही सोबत असतो. दरम्यान, या कंपनीचे वाहन बुधवारी परळी येथे गेले होते. त्यामुळे एका कर्मचाऱ्याने एका बँकेत जाऊन १२ लाख रुपयांची रोकड घेतली तर दुसऱ्याने इतर एका बँकेतून ९ लाख ५४ हजार ४८३ रुपये एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेतील एटीएममध्ये टाकण्यासाठी घेतले. हे सर्व पैसे एका थैलीमध्ये भरले. १२ लाख रुपयांची रक्कम बार्शी रोडवरील एक बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी ते दोघे दुचाकीवरुन निघाले होते. त्यावेळी शिवाजी नगर पोलीस ठाणा परिसातून जात असताना त्यांचा संशय वाहतुक पोलिसास आला. त्यामुळे त्यांनी याबाबत त्या दोन वक्तीकडे विचारणा केली असता त्यांनी थैलीमध्ये पैसे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
विना सुरक्षा दुचाकीवर २१ लाख रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघांना एका बँकेच्या अधिकारी व सुरक्षा एजन्सीची चौकशी उपविभागीय अधिकारी गणेश गावडे पाटील यांनी अधीक्षक कार्यालयात केली. याबाबत त्यांच्याकडील संपुर्ण रकमेबाबतची विचारणा त्यांच्याकडे करण्यात आली. यापुढे अशा प्रकारे, बेजबाबदारपणे ऐवढीमोठी रोकड घेऊन जाऊ नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी तंबी त्यांना देण्यात आली.